जोरहाट: काँग्रेस नेते राहुल गांधी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. जोरहाट येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. राज्यातील जनतेला मोफत वीज देणार, महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये भत्ता देणार आणि राज्यात पाच लाख रोजगारांची निर्मिती करणार, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. (No CAA, Rs 365 for tea workers, Rahul Gandhi reiterates promises in Assam)
जोरहाट येथील रॅलीत विकास कामे आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर भाष्य करतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार केवळ हम दो और हमारे दो… या उक्तीनुसारच काम करत आहे. यात गरीब जनता, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचा काहीही विचार करण्यात आलेला नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तुमच्या खिशातला पैसा काढून तो उद्योगपतींना दिला जात आहे. मोदी सरकार हेच काम करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आसाममध्ये सीएए नाहीच
आसाममध्ये सीएए येणार नाही. आम्ही आसाममध्येच काय देशातही सीएए कायदा लागू होऊ देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. चहाच्या मळ्यातील कामगारांना आम्ही 365 रुपये रोजगार देऊ. मोदी सरकारच्या काळात केवळ 165 रुपये मिळत आहेत. प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत दिली जाईल. महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये दिले जातील. तसेच पाच लाख तरुणांना रोजगार दिला जाईल. आसाममधील सर्व रिक्तपदे भरली जातील, असं सांगतानाच आसाममध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल आणि राज्यात शांतता प्रस्थापित होईल. तसेच राज्याचा विकास वेगाने होईल, असंही ते म्हणाले.
गळ्यात ‘NO CAA’ची मफलर
यापूर्वी त्यांनी डिब्रुगढमध्येही एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांच्या गळ्यात ‘NO CAA’ असं लिहिलेली मफलर त्यांच्या गळ्यात होती. या सभेतही त्यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास सीएए कायदा लागू करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. एका धर्माला दुसऱ्या धर्माशी लढवलं जात आहे. लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. देशाच्या विकासासाठी शांतता प्रस्थापित होणं अत्यंत गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
रॅलींची रेलचेल
दरम्यान, आसाममध्ये आज निवडणुकीची जोरदार रणधुमाळी दिसत आहे. राहुल गांधी हे जनसभेला संबोधित करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज आसामच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदी डिब्रुगढमध्ये एका रॅलीला संबोधित करतणार आहेत. गुरुवारी मोदींनी पहिल्यांदाच आसामच्या करिमगंजमध्ये रॅलीला संबोधित केलं होतं. (No CAA, Rs 365 for tea workers, Rahul Gandhi reiterates promises in Assam)
VIDEO | SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 March 2021https://t.co/66mOzBZQG3
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
Assam Election 2021 : ‘हिंसा हवी की शांती, घुसखोरी हवी की विकास?’ अमित शाहांचा मतदारांना सवाल
आसामच्या निवडणुकीतून CAA मुद्दा गायब?; वाचा, विरोधकांची खेळी आणि सत्ताधाऱ्यांचे डावपेच
कमल हासनच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अब्दुल कलामांच्या सल्लागाराला तिकीट
(No CAA, Rs 365 for tea workers, Rahul Gandhi reiterates promises in Assam)