उत्तर प्रदेश – निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून सत्तेत असलेल्या भाजप (bjp) पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच अनेक आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन इतर पक्षात कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करीत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे कमजोर समजलेल्या जाणा-या समाजवादी पक्षाला (samajwadi party) मोठी उभारी मिळाल्याचे चित्र युपीत निर्माण झाले आहे. भाजपसमोर अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी या निवडणुकीत तगडे आवाहन उभे केल्याची चर्चा आहे.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या अन् भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या गळतीला सुरूवात झाली. ही गळती थांबण्यास भाजपला खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. कारण अनेक सोडून गेलेल्या नेत्यांनी आमदारांनी भाजपवरती जाहीर टीका सुध्दा केली आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीत काटे की टक्कर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
युपीत भाजप सोडून गेलेल्या आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने भाजप समोर तगडे आवाहन उभे केले आहे. समाजवादी पक्षात सामिल झालेल्या आमदारांमुळे भाजपला मोठा धक्का बसेल, अशीही चर्चा आहे. भाजप सोडून गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांनी भाजप विरोधात अपप्रचार सुरू केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपमधील आमदारांची गळती अशीचं सुरू राहिली तर भाजपला येत्या दिवसात मोठा संघर्ष करावा लागेल.
जाहीर झालेल्या अहवालामधून भाजपला 37.2 टक्के मते मिळतील, तर समाजवादी पार्टीला 35.1 टक्के मिळतील असं नमूद करण्यात आलं आहे. सर्वेमध्ये या दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये केवळ 2 टक्के मतांचा फरक आहे. त्यामुळे येणा-या काळात युपीत दोन्ही पक्षात आणखी चुरस वाढेल. तसेच आकडेवारीचा विचार केल्यास 245 जागांपैकी भाजपला 219 जागा मिळतील. तर समाजवादी पक्षाला 154 पैकी 143 जागा मिळतील. बहुजन समाज पक्षाला 8 ते 14 ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसलाही बहुजन समाज पक्षाला एव्हढ्या जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ नवभारतने हा सर्वे केला आहे.