मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी एक्झिट पोलबाबत (Exit Poll) केलेलं एक रीट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. एका एक्झिट पोलचा हवाला देत अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये चक्क आम आदमी पार्टीला शंभरच्या आसपास जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार, पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे. 100 जागा आपला मिळतील, असं सांगितलं जातंय. त्यातील 11 जागा कमी जास्त होऊ शकतात, असंही सांगण्यात आलंय. या अंदाजांनुसार, संपूर्ण बहुमत आपला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब विधानसभा निवडुकांमध्ये आपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता एकीकडे वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपला जेमतेम एकच जागा मिळेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अकाली दलाला 6 तर काँग्रेसला 10 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चाणक्यने वर्तवलेला हा एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांनी रीट्वीट केला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहे. 2017च्या मध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता. तर आप हा दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला होता. 2017 मध्ये आपला 20 जागा जिंकण्यात यश आलं होतं. तर काँग्रेसनं 77 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, अकाली दलाला 15 तर भाजपला 3 जागा जिंकण्यात यश आलं होतं. दरम्यान, आता 10 मार्चला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांत कुणाच्या पारड्यात नेमक्या किती जागा मिळतात, हे स्पष्ट होईल. मात्र त्याआधी समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलची चर्चा रंगली आहे.
#TCPoll
Punjab 2022
Seat Projection
AAP 100 ± 11 Seats
Cong 10 ± 7 Seats
SAD+ 6 ± 5 Seats
BJP+ 1 ± 1 Seats
Others 0 ± 1 Seats#News24TodaysChanakyaAnalysis— Today’s Chanakya (@TodaysChanakya) March 7, 2022
‘कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील!’ निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना काळजी करण्याचा सल्ला