मुंबई : ज्या निवडणुकीच्या निकलाची प्रतीक्षा संपूर्ण देशाला (Five State Election result 2022) लागली होती ते निकाल समोर आले. त्यात एकहाती भाजपची ताकद पहायला मिळाली मात्र पंजाबमधील (Punjab election result 2022) निकाल सर्वांना हादरवून सोडणारे ठरले कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने (Aam Admi Party) सर्वांना टक्कर देत गड काबीज केला. यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत केलेल्या कामामुळे पंजाबच्या जनतेला आपला बहुमत दिले. इतर ठिकाणी तसं झालं नाही. इतर कोणताही पक्ष जनतेच्या मनात उतरू शकला नाही. त्यामुळे तिथे भाजपला कौल दिला असे, पवार म्हणाले. त्याचबरोबर माझ्या बंगल्यात काम करणाऱ्यांनीही आपला मतं दिली असेही पवारांनी आवरजून सांगितलं. त्यामुळे पवारांचे हे वाक्य चांगलेच चर्चेत आले आहे.
केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीतल्या निकालानंतर भारताला आता एक नंबर देश बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. अशी सूचक प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
केजरीवाल काय म्हणाले?
अब भारत को दुनिया का नंबर 1 देश बनने से कोई नहीं रोक सकता ❤️??
– श्री @ArvindKejriwal #AAPSweepsPunjab pic.twitter.com/dqKwbNBN5J
— AAP (@AamAadmiParty) March 10, 2022
पुढील काळात एकत्र येण्याची गरज
केजरीवाल यांच्या विजयाबाबत बोलतना, चार राज्यातील जनादेश हा भाजपाच्या बाजूने आला आहे. दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल आहे. या जनादेशाचा आदर केला पाहिजे. आता पुढच्या काळात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एक प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी पवार देताना दिसून आले. या निकालावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना फटकारले आहे. पंजाबमधील निकाल भाजपला अनुकूल नाही, पण काँग्रेससाठी मोठा झटका आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
केजरीवाल यांनी मनं जिंकली
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे एक वेगळं चित्रं पाहायला मिळत आहे. पण पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाही. मात्र काँग्रेसला झटका देणारा हा बदल आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी ज्या प्रकारचं यश संपादन केलं आणि ज्या प्रकारे प्रशासन सांभाळलं त्याबद्दल दिल्लीच्या लोकांनी त्यांना पावती दिली. पंजाब हे दिल्लीच्या शेजारचं राज्य आहे. त्यामुळे दिल्लीतील कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला. तसेच पंजाब सोडलं तर इतर राज्यात जे पक्ष आहेत. त्यांनाच मतदारांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे इतर राज्यात भाजपचं सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे, असं शरद पवार म्हणाले.