नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 20 फेब्रुवारीला होणार आहे. उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या जागांसाठी 627 उमेदवार रिंगणात असतील. माजी मुख्यंमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या देखील जागा या टप्प्यात आहेत. भाजपच्या सतीश महाना आणि एसएसपी बघेल यांच्याही जागेवर मतदान होईल. दुसरीकडे पंजाब (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी यावेळी भाजपशी युती केलीय. पंजाबमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचा पंजाबच्या निवडणुकीवर किती परिणाम होईल, हे यानिमित्तानं समोर येईल. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला सुरुवात होणार आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून 117 जागांसाठी सकाळी मतदानाला सुरुवात होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्याच वेळी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44 टक्के झाले. या निवडणुकीत 1,304 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 93 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर आहेत.
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, ‘काका गेले तर बाबाही जातील. काका म्हणजे काळा कायदा. उत्तर प्रदेशात सुमारे 11 लाख पदे रिक्त आहेत, जी भरली जाणार आहेत. या सरकारने भरले नाही. सपाचे सरकार आल्यास 11 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम सपा करेल.
उन्नावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ज्या सीटला हे लोक सर्वात सुरक्षित समजत बसले होते, ती सीटही हाताबाहेर जात आहे. ज्या बापाला स्टेजवरून ढकलून दिले, अपमानित करून पक्ष काबीज केला, त्याला माझी जागा वाचवा, अशी विनवणी करावी लागली. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार स्वतःच्या जागेवर असुरक्षित असताना वाऱ्याची दिशा कळू शकते.
रोड शो करण्यासाठी लखनौला पोहोचलेल्या शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी येथे रोड शो करण्यासाठी आले होते. मार्गही दिला आहे. सर्व काही ठरले होते. शेवटच्या क्षणी त्यांचा होकार फेटाळण्यात आला. ते मार्ग देत नसल्याचे रिटर्निंग अधिकाऱ्यांनी नाकारले. 14-15 पोलिस तेथे आले आणि तुम्ही रोड शो करणार नाही, असे सांगू लागले. तसे केल्यास आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ.
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत 48.81 टक्के मतदान झाले आहे. आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत 35.88 टक्के मतदान झाले आहे. त्यावेळी एटामध्ये सर्वाधिक 42.31 टक्के आणि ललितपूरमध्ये 41.10 टक्के मतदान झाले होते. यापूर्वी सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.18 टक्के मतदान झाले होते, तर रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 8.15 टक्के मतदान झाले होते.
मैनपुरी जिल्ह्यातील 108 भोगाव विधानसभेतील 102, 103, 104 अलिपूर पट्टीवर बूथ क्रमांक 102, 103, 104 येथे भाजपच्या एका मंत्र्याचा मुलगा आपल्या शेकडो समर्थकांसह मतदानाचा डंप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
मैनपुरी जिले की 108 भोगाँव विधान सभा, बूथ संख्या 102, 103, 104 आलीपुर पट्टी पर BJP मंत्री का बेटा अपने सैकड़ों समर्थकों के साथ पोलिंग डम्प करने का प्रयास कर रहा है। चुनाव आयोग कृपया संज्ञान लेते हुए निष्पक्ष और पारदर्शी मतदान कराना सुनिश्चित करें @ECISVEEP@ceoup@DmMainpuri
— Samajwadi Party (@samajwadiparty) February 20, 2022
पंजाबमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान झालं आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी आमचं बहुमतांचं सरकार सत्तेत येईल, असं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील कारभार हा कायद्याप्रमाणेच चालेल. समाजवादी पार्टी संस्थांना मजबूत करणार असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय. आम्हाला लोकशाहीमध्ये राहायचं आहे. ही निवडणूक देशातील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं संविधान आणि लोकशाही मजबूत होईल, असं अखिलेश यादव म्हणाले.
Uttar Pradesh Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 21.18 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. ललितूपर मध्ये सर्वाधिक 26 टक्के मतदान झालं आहे. कानपूरमध्ये सर्वात कमी 16.79 टक्के मतदान झालं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
तीसरे चरण के अंतर्गत 16 जनपदों में पूर्वाह्न 11 बजे तक कुल औसतन मतदान 21.18% रहा।#ECI#विधानसभाचुनाव2022#AssemblyElections2022 #GoVote #GoVoteUP #GoVoteUP_Phase3 pic.twitter.com/dQmao2xfZm
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 20, 2022
शिरोमणी अकाली दलाकडून बुथवर ताबा घेण्यात आल्याचा आरोप आपच्या राघव चढ्ढा यांनी केला आहे. गुरु हर सहाय विधानसभा मतदारसंघात तील 23 नंबरच्या बुथवर हा प्रसंग घडल्याचं चढ्ढा म्हणाले. पंजाबमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाल्याचं दिसून आलंय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत 8.15 टक्के मतदान झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
Kannauj Voting Percentage Updates: कनौजमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.11 टक्के मतदान झालंय.
उत्तर प्रदेशात नवविवाहित जोडप्यानं मतदान केलं आहे. हनुमानगड लक्ष्मी कॉन्वेंट स्कूल मतदान केंद्रावर एका नवविवाहित जोडप्यानं मतदान केलं.
A newly-wed bride, Julie cast her vote at polling booth no.305 in Firozabad assembly constituency before leaving for her in-laws’ house. She got married last night and was leaving for her in-laws’ house this morning. #UttarPradeshElection2022 pic.twitter.com/YtRxthyNik
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 20, 2022
तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळं अखिलेश यादव हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याचं चित्र दिसत आहे, असं शिवपाल यादव यांनी म्हटलं आहे. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असं देखील शिवपाल यादव म्हणाले. अखिलेश यादव 300 च्या बहुमतानं सरकार बनवतील, असं शिवपाल यादव म्हणाले.
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील अमृतपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम खराब झाल्याचा दावा समाजवादी पार्टीकडून करण्यात आला आहे.
Punjab Election Update : पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी आता मतदारांची मर्जी असल्याचं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत यापैकी 49 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं भाजपसाठी हा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे.
– राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यात उद्या बैठक,
– इम्पिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होत असून त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन,
– कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबत या बैठकीत नियोजन केले जाणार,
– इम्पिरिकल डाटा जमा करण्याचे टप्पे आणि प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार.
उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी तिथं मतदान होत आहे.
Voting begins for the third phase of #UttarPradeshElections; 59 assembly seats across 16 districts of the state going to polls.
Fates of SP chief Akhilesh Yadav, contesting from Karhal and his challenger & BJP candidate Union minister SP Singh Baghel will be sealed today. pic.twitter.com/TZZwCBY01C
— ANI (@ANI) February 20, 2022
पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांसाठी यावेळी 1304 उमेदवार रिंगणात आहेत. पंजाब राज्य स्थापनेपासून ही 16 वी निवडणूक आहे. 2017 मध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवली होती. काँग्रेसला 77, आम आदमी पार्टीला 20 जागा, शिरोमणी अकाली दलाला 15 आणि भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. पंजाबच्या विधानसभेचा कालावधी 27 मार्चला संपत आहे.
पंजाब (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी यावेळी भाजपशी युती केलीय. पंजाबमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे.
उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या जागांसाठी 627 उमेदवार रिंगणात असतील. माजी मुख्यंमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या देखील जागा या टप्प्यात आहेत. भाजपच्या सतीश महाना आणि एसएसपी बघेल यांच्याही जागेवर मतदान होईल.