नवी दिल्ली : 2024 मधील लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा (5 State Assembly Election) धुरळा आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जाहीर करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज पत्रकार परिषद घेत या पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाचही राज्यांमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातील पंजाब आणि उत्तराखंडमधील निवडणुकीची तारीख आणि संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
पंजाबमधील 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार पंजाबमध्ये 20 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी असेल. तर 31 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर अन्य राज्यांसोबत 10 मार्च रोजी पंजाबमध्ये मतमोजणी होणार आहे.
>> 8 जानेवारीला अधिसूचना जारी
>> किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
>> कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
>> निकाल कधी? – 10 मार्च
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेत उत्तराखंडमधील सर्व जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी 25 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. 29 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 31 जानेवारी आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी राज्यातील 70 जागांसाठी मतदान पार पडेल. तर सर्व पाच राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी होणार आहे.
>> 8 जानेवारीला अधिसूचना जारी
>> किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
>> कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
>> निकाल कधी? – 10 मार्च
उत्तराखंड विधानसभा निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 81 लाख 43 हजार 922 मतदार आहेत. त्यातील 42 लाख 24 हजार 288 पुरुष, तर 39 लाख 19 हजार 334 महिला मतदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 75 लाख 92 ङजार 845 मतदार होते.