कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. परंतु, या मतदांनापूर्वीच बंगालमध्ये एका ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राज्यात टीएमसीचा पराभव होणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपने या ऑडिओ क्लिपचा काही भाग लिक केला आहे. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच प्रशांत किशोर यांनी धाडस असेल तर पूर्ण ऑडिओ रिलीज करा, असं आव्हानच भाजपला दिलं आहे. (Show Courage, Share Full Chat, says Prashant Kishor)
भाजप नेते अमित मालवीय यांनी चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू होण्यापूर्वीच एकापाठोपाठ एक ट्विट करत प्रशांत किशोर यांचं ‘क्लब हाऊस अॅप’वरील संभाषणाची ऑडिओ क्लिप पोस्ट केली. यात प्रशांत किशोर काही पत्रकारांशी चर्चा करताना दिसत आहेत. त्यात ते मोदी यांच्या प्रभावामुळे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपला आव्हान
प्रशांत किशोर यांनी हा ऑडिओ क्लिपमधील दाव्यावर आक्षेप घेतला आहे. पूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी भाजपने संपूर्ण ऑडिओ क्लिप व्हायरल केली पाहिजे. भाजपला 40 टक्के मते कशी मिळत आहेत? आणि भाजप विजयी होणार अशी चर्चा आहे, असा सवाल मला करण्यात आला. त्याला उत्तर देताना मी हे मत व्यक्त केलं होतं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. आपल्या पक्षनेतृत्वा पेक्षा माझ्या बोलण्याला भाजप अधिक किंमत देते हे पाहून बरं वाटलं, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
In a public chat on Club House, Mamata Banerjee’s election strategist concedes that even in TMC’s internal surveys, BJP is winning.
The vote is for Modi, polarisation is a reality, the SCs (27% of WB’s population), Matuas are all voting for the BJP!
BJP has cadre on ground. pic.twitter.com/3ToYuvWfRm
— Amit Malviya (@amitmalviya) April 10, 2021
ऑडिओ क्लिपमधील संभाषण काय?
बंगालमध्ये मोदींच्या नावाने मते मिळत आहेत. हिंदूच्या नावानेही मिळत आहेत. बंगालमध्ये ध्रृवीकरण सुरू आहे. हिंदी भाषिक आणि अनुसूचित जाती वर्ग हाच बंगालच्या निवडणुकीचा विजयाचा फॅक्टर आहे. मोदी इथे लोकप्रिय आहेत. मतुआ समुदायाची मते भाजपला मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत. बंगालमध्ये टीएमसीच्या विरोधात जनमत असून मोदींच्या विरोधात नाही, असं प्रशांत किशोर या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत. बंगालच्या राजकारणाची इकोसिस्टम मुस्लिम व्होट मिळवण्याची राहिली आहे. मात्र, आता पहिल्यांदाचा आपल्याविषयी बोललं जात आहे, आपली दखल घेतली जात आहे, असं हिंदूंना वाटत असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
काय आहे हा अॅप?
‘क्लब हाऊस’ हा एक अॅप आहे. त्यावर ऑडिओ कॉन्फरन्स केली जाते. या कॉन्फरन्सचा कुणी तरी व्हिडीओ तयार केल्याची शक्यता आहे. कारण क्लब हाऊस अॅपमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा नाही. या ऑडिओ क्लिपचा बनवलेल्या व्हिडीओचा काही भाग भाजपने व्हायरल केला आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या चर्चेत काही पत्रकारही सहभागी झाले होते. (Show Courage, Share Full Chat, says Prashant Kishor)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 50 न्यूज | 8 AM | 10 April 2021https://t.co/2GHM2LVTul
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2021
संबंधित बातम्या:
ममता बॅनर्जींच्या गोटातील गुप्त बातमी अनावधानाने फुटली; मोदींच्या लोकप्रियतेमुळे तृणमूलचा पराभव अटळ
VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
(Show Courage, Share Full Chat, says Prashant Kishor)