चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत पैशाचा महापूर वाहताना दिसत आहे. आयकर विभागाने अण्णाद्रमुकचे आमदार आर. चंद्रशेखर यांचा ड्रायव्हर अलगरासामी याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात आयकर विभागाने एक-दोन लाख रुपये नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Tamil Nadu assembly polls: Rs 1 cr seized from AIADMK MLA Driver’s car)
आयटी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 500 रुपयांच्या या सर्व नोटा होत्या. आयटी अधिकाऱ्यांना टिप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हा छापा मारून ही रक्कम जप्त केली आहे. टिप मिळाल्यानंतर आयटी विभागाने आमदाराच्या घरावर छापा मारला. रविवारी सकाळी हा छापा मारून दिवसभर सर्च ऑपरेशन करण्यात आलं.
कारमध्ये घबाड
यापूर्वी अण्णाद्रमुकच्या नेत्याच्या कारमधून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. भरारी पथकाने पेट्टावैथालाई पुलावर चेकिंग करत असताना ही कारवाई केली होती. ही कार कथितपणे मुसिरीहून पार्टीचे आमदार सेल्वराज यांची असल्याचं सांगण्यात आलं होतं. याच मतदारसंघातून अण्णाद्रमुकने सेल्वराज यांना तिकीट दिलं आहे.
तीन कोटी जप्त
चेकींग करताना पैशाचं घबाड सापडल्यानंतर कारमधील लोकांना हा पैसा कुठून आला असं विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी आम्हाला माहीत नसल्याचं सांगितलं. तर गेल्याच आठवड्यात श्रीविल्लीपुथुर विधानसभा मतदारसंघातही एका वाहनातून 3.21 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
मतदान केंद्रे वाढवली
तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 6 एप्रिल रोजी तामिळनाडूत 234 जागांसाठी मतदान होणार आहे. 2016मध्ये तामिळनाडूत 66,007 मतदान केंद्रे होती. आता ही संख्या 88,936 झाली आहे. येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Tamil Nadu assembly polls: Rs 1 cr seized from AIADMK MLA Driver’s car)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 March 2021https://t.co/SDhImUuuES
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या:
(Tamil Nadu assembly polls: Rs 1 cr seized from AIADMK MLA Driver’s car)