Marathi News Elections UP Assembly Election 2022 Live Result 10 points of UP Assembly elections
UP Assembly Election 2022 Live Result : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'योगी'राज, भाजपला स्पष्ट बहुमत, मात्र जागा घडल्या, स्वतःच्या जागेसह सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'योगी'राज, भाजपला स्पष्ट बहुमत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ‘योगी’राज, भाजपला स्पष्ट बहुमत, मात्र जागा घडल्या, स्वतःच्या जागेसह सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश
अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी बनली नंबर दोनचा पक्ष, सपाच्या जागांमध्ये वाढ, अखिलेश यादव यांचाही विजय!
लखीमपूरमध्ये सगळ्या सगळ्या 10 विधानसभेच्या जागा भाजपनं जिंकल्या आहेत. लखीमपूरमध्येच एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सध्या चौकशी आणि कारवाई सुरु आहे. मात्र लखीमपूर घटनेचा आणि यूपीतील निवडणुकांचा कोणताही परिणाम मतांवर जाणवलेला नाही, हे निकालातून स्पष्ट झालंय
उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचे कल दिसू लागताच, शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
तुरुंगात राहून निवडणूक लढवत असलेले बाहुबली नेते विजय मिश्रा पराभूत, भाजप आघाडीचे उमेदवार विपुल दुबे यांचा विजय, तुरुंगात असलेल्या विजय मिश्रांसाठी पत्नी आणि मुलगी यांचा सुरु होता प्रचार, पण मतदारांची दुबेंना साथ
योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांचा पराभव, सिराथू मतदारसंघातून लढवली होती निवडणूक
भाजपला सोडचिट्ठी देत सपाच्या सायकलवरुन स्वार झालेले स्वामी प्रसाद मौर्य यांचा पराभव
उत्तर प्रदेशात शिवसेनेला शून्य जागा, 41 जागा लढवल्या, आदित्य ठाकरेंची सभा झाली, मात्र त्याचा यूपीतील मतदारांवर कोणताही परिणाम नाही, उलट आता यूपी शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची भीती
शिवसेनेसोबत काँग्रेसनंही यूपीत सपाटून मार खाल्ला आहे, काँग्रेसला कशाबशा अवघ्या दोन जागांवर यश मिळालं आहे. तर मायावतींच्या बसपाला अवघ्या एका जागी यश मिळालंय.
केजरीवालांची आम आदमी पार्टी, ओवेसींची एमआयएम यांना उत्तर प्रदेशात भोपळाही फोडता आलेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आप, एमआयएम, काँग्रेस, शिवसेना आणि बसपापेक्षा एसबीएसपी (सुहेलदेव भारतीय समाज पार्टी) पक्षानं यूपीत सहा जागी विजय नोंदवला आहे.