लखनऊः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेसने ( uttar pradesh congress) 41 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या 16 महिला उमेदवार आहेत. यापूर्वी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. ही यादी जाहीर करताना काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुणांचा समावेश असेल असा निर्धार केला होता. त्यानुसार काँग्रेसने हाजी अखलाक यांना कैराना येथून तिकीट दिले आहे. सोबतच मेरठमधून रंजन शर्मा, आगरा कैंटमधून सिकंदर वाल्मीकि आणि मांट येथून सुमन चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरण देशभर गाजले. या प्रकरणातील पीडितेच्या आईला काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. तर मोठ्या नावांमध्ये सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनाही तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष लल्लू आणि प्रतापगढच्या रामपूरखास जागेवरून आराधना मिश्रा मोना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच सदफ जाफर यांनाही तिकीट देण्यात आले आहे. तर उन्नाव येथून आशा सिंह या उमेदवार राहणार आहेत.
आदिती सिंह यांचा राजीनामा
काँग्रसेचा गढ समजला जाणाऱ्या रायबरेली मतदार संघाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या बंडखोर आमदार आदिती सिंह यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी यांना पत्र लिहून दिला आहे. सोनियाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत. कृपया राजीनामा स्वीकारावा. असे दोन ओळींचे पत्र त्यांनी लिहिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार आहे.
Uttar Pradesh | Raebareli Sadar MLA Aditi Singh resigns from Congress pic.twitter.com/zWDh05lMYA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 20, 2022
पतीला बसणार फटका
आदिती सिंह यांनी नोव्हेंबरमध्येच औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या धोरणाविरोधात वक्तव्ये केली होती. अनेकदा केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुकही केले होते. विशेष म्हणजे आदिती सिंह यांनी पक्षाच्या महासचिव प्रियांका यांच्यावरही अनेकदा टीका केलीय. मात्र, त्यांच्या या निर्णयाचा फटका त्यांचे पती अंगद सिंह यांना बसू शकतो. अंगद हे पंजाबच्या नवांशहर येथील काँग्रेस आमदार आहेत. आदिती या काँग्रेसच्या गढात आमदार होत्या. त्यांचे वडील अखिलेश हे येथून पाच वेळेस आमदार राहिले आहेत.
इतर बातम्याः
Goa election | आप, तृणमूल आणि काँग्रेसचं फडणवीसांकडून वस्त्रहरण, वाचा कोणत्या पक्षावर कोणते आरोप!