लखनऊ: बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करतानाच मायावती यांनी ‘हर पोलिंग बूथ को जिताना है BSP को सत्ता में लाना है’ हा नारा दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता मायावतींना साथ देतात का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या टप्प्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात 55 जागांवर निवडणुका होत आहेत. त्यापैकी 51 जागांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर चार उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचं मायावती यांनी सांगितलं. मायावती यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
बसपाने निवडणूक प्रचार सुरू न केल्याबद्दल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सवाल केले होते. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही निवडणूक प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत, असं मायावती म्हणाल्या.
दरम्यान, काल काँग्रेसनेही त्यांचा जाहीरनामा जारी करून नोकऱ्यांची हमी दिली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावेळी संवाद साधला. उत्तर प्रदेशातील तरुणांशी संवाद साधून हा निवडणूक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. आमच्या टीमने उत्तर प्रदेशातील एकूण एक तरुणांशी चर्चा केली आहे. यात भरती विधान असा शब्द प्रयोग केला आहे. कारण सर्वात मोठी समस्या भरतीची आहे. पण आम्ही 20 लाख नोकऱ्या देणार. तरुणांचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं प्रियंका म्हणाल्या.
तर, समाजवादी पार्टीने थेट नागरिकांना 300 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यांना 300 यूनिट वीज मोफत हवी आहे, त्यांनी फॉर्ममध्ये आपलं नाव लिहून हा फॉर्म पक्षाकडे जमा करा. तुम्हाला वीज देऊ. मोफत वीज देण्याचा हा मुद्दा निवडणूक घोषणापत्रातही समाविष्ट करण्यात आला आहे, असं सांगतानाच ज्या नावाने विजेचे बिल येते, तेच नाव या फॉर्ममध्ये भरायचं आहे, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 22 January 2022 #FastNews #BREAKING pic.twitter.com/Dbl7E1XZ4C
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2022
संबंधित बातम्या:
यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ
Explained | भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?
Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली