लखनऊः उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकारने केलेल्या एका जाहिरातीवरून पुन्हा एकदा प्रचंड वादंग उठले आहे. डाव्या नेत्या कविता कृष्णन यांनी या जाहिरातीबद्दल जोरदार आक्षेप घेत थेट आदित्यनाथ योगी यांच्यावर ही ‘इस्लामोफोबिक’ जाहिरात असल्याचे म्हणत हल्लाबोल केलाय. येणाऱ्या काळात हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत.
नेमकी जाहिरात काय ?
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकाने आपल्या कामकाजाची जोरदार जाहिरातबाजी सुरू केलीय. त्या संदर्भातली एक जाहिरात इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यात एकूण 5 वाक्य आणि 2 चित्र आहेत. जाहिरातीचा मथळा ‘फर्क साफ है’ असा आहे. त्या खाली ‘2017 पूर्वी’ अशी ओळ आहे. त्याखाली ‘दंगेखोराची भीती’ अशी एक ओळ आहे. त्या ओळीखाली गळ्यात रूमाल टाकलेला एक तरुण हातातली पेटलेली बाटली फेकत असल्याचे दाखवले आहे. पुढे चौथे वाक्य ‘2017 नंतर’ असे आहे. त्याखाली ओळ आहे, ‘मागत आहेत माफी’. या ओळीखाली तीच व्यक्ती दुसऱ्या पेहरावात हात जोडून माफी मागत असल्याचे दाखवले आहे.
Dear @rajkamaljha – take a close look at this @IndianExpress front page with a huge Islamophobic ad by the UP Govt enjoying pride of place. You can’t pretend that this is a mere commercial decision – this ad editorialises, & makes the paper a vehicle for fascism. Chilling to see. pic.twitter.com/HEARJG8wGM
— Kavita Krishnan (@kavita_krishnan) December 31, 2021
कृष्णन यांचे ट्वीट
डाव्या नेत्या कविता कृष्णन यांनी या जाहिरातीवर ट्वीट करून टीका केली आहे. त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर नजर टाका. जिथे यूपी सरकारची एक इस्लामोफोबिक जाहिरातीचा आनंद घेतला जात आहे. आपण केवळ हा व्यावसायिक निर्णय असल्याचे ढोंग करू शकत नाही. ही जाहिरात म्हणजे संपादकीय निर्णय आहे. ती वृत्तपत्राला फाशीवादाची वाहक बनवते आणि ते भीतीदायक आहे, अशी टिपण्णी केली आहे.
ट्वीटरवर ट्रेंड
योगी सरकारची जाहिरात आणि कविता कृष्णन यांनी घेतलेला आक्षेप यावरून ट्वीटवर जबरस्त ट्रेडिंग सुरू आहे. तिथे दोन गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात अभिषेक शाह नावाच्या एका यूजरने कविता कृष्णन यांच्यावर आरोपावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जाहिरातीमध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही. तुम्ही विनाकारण त्याला ‘इस्लामोफोबिक’ काय म्हणताय, असा सवाल केला आहे. दुसरीकडे अपूर्वानंद या यूजरने जाहिरात पाहूनच शॉक बसल्याचे म्हटले आहे. हा ‘इस्लामोफोबिक’ प्रोपोगंडा आहे. याची तक्रार मी संपादकाकडे केल्याचा उल्लेखही केला आहे. एकदंर दोन्ही बाजून आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे.
यापूर्वी दिलगिरी व्यक्त
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी यापूर्वी इंडियन एक्स्प्रेसमध्येच केलेल्या जाहिरातीमुळे योगी सरकार वादात सापडले होते. सरकारने याच वृत्तपत्रामध्ये राज्यातील विकास कामे दाखवणारी एक जाहिरात ‘ट्रान्सफॉर्मिग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो, तसेच राज्याची प्रगती आणि विकास दाखवण्यासाठी इतरही फोटो होते. या फोटोत दाखवलेला पूल पश्चिम बंगालमधील कोलकात्याचा असल्याचे आरोप झाले होते. यावरून काँग्रेसह तृणमूल काँग्रेसने यूपी सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या माहिती प्रसारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांना दिलिगिरी व्यक्त करावी लागली आहे.
New Year’s changes|1 जानेवारीपासून काय महागलं, काय स्वस्त झालं, घ्या जाणून?