लखनऊ: समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव कोणत्या मतदारसंघातून लढणार? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. ज्या मैनपुरीच्या करहलमध्ये वडील मुलायम सिंह यादव यांनी शिक्षण घेतलं आणि नोकरीही केली. त्याच मतदारसंघातून अखिलेश यादव निवडणूक लढणार आहे. अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अखिलेश यादव हे आजमगढच्या गुन्नौरमधून निवडणूक लढतील असं सांगितलं जात होतं. मात्र अखिलेश यांनी सर्व अंदाज फोल ठरवत मैनीपूरीच्या करहलमधून लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी करहलच्या जैन इंटर कॉलेजातून शिक्षण घेतलं होतं. याच ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती. मुलायम सिंह यादव यांचं गाव सैफईपासून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर करहल गाव आहे.
करहल विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा नेहमीच दबदबा राहिला आहे. 2007, 2012 आणि 2017 या तिन्ही निवडणुकीत समाजवादी पार्टीने विजय मिळवला आहे. करहल विधानसभा मतदारसंघ सैफईच्या बाजूलाच आहे. त्यामुळे मुलायम सिंह यादव यांचा या मतदारसंघात नेहमी हस्तक्षेप असतो. गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघात सोबरन यादव आमदार आहेत. अत्यंत सामान्य नेता म्हणून ओळख असलेल्या सोबरन यांच्या डोक्यावर मुलायम सिंह यांचा हात आहे. 2017 च्या निवडणुकीत सोबरन सिंह यादव यांनी 104221 मते घेऊन भाजपाचे राम शाक्य यांचा 38405 मतांनी पराभव केला होता. बसपाने या मतदारसंघातून दलवीर यांना उमेदवारी दिली होती. तर आरएलडीने यादव मतात फूट पाडण्यासाठी कौशल यादव यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
अखिलेश यादव मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील करहलमधून लढत असल्याने अन्य जिल्ह्यातही त्याचा फरक पडणार आहे. कानपूर आणि आग्रा मंडळातील अनेक जागांसह फिरोजाबाद, एटा, ओरैया, इटावा, कन्नौजसहीत अनेक जागांवर त्याचा परिणाम होणार आहे. हे जिल्हे समाजवादी पार्टीचे गड मानले जाता. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या उमेदवारीमुळे या जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टीला मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यादीत 63 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. ज्या 107 उमेदवारांना भाजपने तिकीट दिलं त्यामध्ये 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांचा समावेश आहे. म्हणजे भाजपाने पहिल्या यादीत ओबीसी, एससी आणि महिला आदी 68 टक्के उम्मीदवारांना तिकीट दिलं आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या:
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा