लखनऊ: उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. भाजपने आज 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 21 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तसेच या यादीत भाजपने ओबीसी, एससींना मोठ्या प्रमाणावर तिकीट देऊन सोशल इंजीनियरिंगवर भरही दिला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकूण 107 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हे 21 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवतील. तर, 21 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यादीत 63 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. ज्या 107 उमेदवारांना भाजपने तिकीट दिलं त्यामध्ये 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांचा समावेश आहे. म्हणजे भाजपाने पहिल्या यादीत ओबीसी, एससी आणि महिला आदी 68 टक्के उम्मीदवारांना तिकीट दिलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात तीन कॅबिनेट मंत्री आणि सहा आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळेच भाजपची निवडणूक यादी उशिराने आली आहे. 2017ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा दबाव असतानाच मंत्री आणि आमदारांनी पक्ष सोडल्याने भाजप बॅकफूटवर आहे. त्यामुळे पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
शामली- तजेंद्र सिंह निर्वाल
बुढ़ाना- उमेश मलिक
चरथावल- सपना कश्यप
पूरकाजी- प्रमोद ओटवाल
मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल
खतौली- विक्रम सैनी
मीरापूर- प्रशांत गुर्जर
सिवालखास- मनेंद्र पाल सिंह
सरदना- संगीत सोम
हस्तिनापूर- दिनेश खटीक
मेरठ कँट- अमित अग्रवाल
किठोर- सत्यवीर त्यागी
मेरठ- कमलदत शर्मा
मेरठ साउथ- सोमेंदर तोमर
छपरउली- सहेंद्र सिंह रमाला
बड़ोत- केपी सिंह मलिक
बागपत- योगेश धामा
लोनी- नंदकिशोर गुर्जर
मुरादनगर-अजीत पाल त्यागी
साहिबाबाद- सुनील शर्मा
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 15 January 2022 pic.twitter.com/6meeifw1kK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2022
संबंधित बातम्या:
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा