नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील 20 लाख तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांवर अधिक फोकस करण्यात आल्याने या जाहीरनाम्याला युथ मेनिफेस्टो म्हणून संबोधण्यात आलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा जाहीर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही हा युथ मॅनिफेस्टो जाहीर करत आहोत. आम्ही उत्तर प्रदेशातील तरुणां कशा प्रकारे रोजगार देणार आहोत, हे या निवडणूक घोषणापत्रात नमूद केलं आहे. पक्षाने उत्तर प्रदेशातील तरुणांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना या जाहीरनाम्यातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, नोकऱ्या खरंच मिळाल्या का हे तुम्ही पाहातच आहात, असं राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावेळी संवाद साधला. उत्तर प्रदेशातील तरुणांशी संवाद साधून हा निवडणूक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. आमच्या टीमने उत्तर प्रदेशातील एकूण एक तरुणांशी चर्चा केली आहे. यात भरती विधान असा शब्द प्रयोग केला आहे. कारण सर्वात मोठी समस्या भरतीची आहे. पण आम्ही 20 लाख नोकऱ्या देणार. तरुणांचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं प्रियंका म्हणाल्या.
या भरती विधानमध्ये पाच सेक्शन आहेत. त्यात तरुणांच्या विविध समस्यांवर फोकस करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यालयातील 1.5 लाख पदे खाली आहेत. ती भरली जातील. माध्यमिक, उच्च माध्यमिक, पोलीस आदी विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. संस्कृत शिक्षक, उर्दूचे शिक्षक, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका आदी रिक्त पदे भरली जातील. तरुणांनी मोठ्याप्रमाणावर अर्ज करावा आणि नोकरी मिळण्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हावा म्हणून परीक्षेचे फॉर्म नि:शुल्क करण्यात येईल. परीक्षेसाठी बस आणि ट्रेनमधील प्रवास मोफत करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
परीक्षार्थींना रेल्वे, बसमधून मोफत प्रवास
8 लाख सरकारी पदांवर महिलांची भरती करणार
20 लाख सरकारी नोकऱ्यांची हमी
शिक्षकांची दीड लाख रिक्त पदे भरणार
जॉब कॅलेंडर तयार करणार, पेपर, जॉयनिंगची तारीख ठरवणार
30 वर्षाखालील नवउद्योजकांना प्रोत्साहन देणार
सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करणार
सीड स्टार्टअफ फंडासाठी 5 हजार कोटींची तरतूद करणार
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 21 January 2022 pic.twitter.com/jad1VrIbWp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2022
संबंधित बातम्या: