उत्तर प्रदेश – आज भाजपकडून विधानसभेची निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये भाजपकडून 105 जणांची यादी जाहीर केली, परंतु उमेदवारी जाहीर करताना त्यांनी ओबीसी (obc) कार्ड खेळल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत सद्याचे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adithnath) यांना गोरखपूर (gorakhpur) मधून उमेदवारी जाहीर केली आहे, तसेच त्यांची उमेदवारी जाहीर करत असताना युपीच्या चांगल्या कामासाठी त्यांचं कौतुकही केलं आहे. आज जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 19 जागा या अनुसुचित समाजासाठी देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 10 जागा महिलांना देण्यात आल्या आहेत. एकूण मागासवर्गीय समाजासाठी भाजपकडून अनेक जागा शिल्लक ठेवल्याची चर्चा आहे.
पहिल्या दोन टप्प्यात होण-या मतदानासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीकडून आज यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये टप्प्यासाठी 57 आणि दुस-या टप्प्यासाठी 48 सीट जाहीर केल्या आहेत. राज्याचे सद्याचे उपमुख्यमंत्री केशन प्रसाद मौर्या यांना सिराथु मधून तिकीट देण्यात आली आहे. भाजपने युपीत जातीचं गणित डोळ्यासमोर ठेऊन सीट वाटप करण्यात आल्याचे दिसून आले आहे. आज जाहीर केलेल्या यादीत ओबीसींना अधिक तिकीट देण्यात आली आहेत.
आज मागच्यावेळी निवडून आलेल्या 20 आमदारांचा पत्ता कापला गेला आहे. भाजपने आमदारांना सांगितल्याप्रमाणे ज्यांचं काम चांगलं नसेल त्यांना पुढच्यावेळी सीट मिळणार नाही, ते आज भाजपने खरं करून दाखवलं आहे. त्याचबरोबर नवीन उमेदवार शोधून त्यांनी 21 नव्या चेह-यांना संधी दिली आहे. नवीन संधी देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अधिकतर नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्ती आहेत.
आज जाहीर केलेल्या 105 सीटमध्ये किमान 68 सीट या फक्त जातीचं गणित डोळ्यासमोर ठेवून देण्यात आल्या आहेत. कारण 68 सीट या फक्त ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी देण्यात आल्या आहेत. तसेच दुस-या टप्प्यातील 44 सीट पैकी 19 सीट या फक्त मागासवर्गीय समाजातील लोकांना देण्यात आल्या आहेत.