उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 14 फेब्रुवारीला होत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 586 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. दुसरीकडे गोवा आणि उत्तराखंडमध्ये ही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोव्यात 40 जागांसाठी मतदान होईल. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. गोवा आण उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. तर, गोव्यात आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस किती करिष्मा दाखवणार हे पाहावं लागणार आहे.
उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील आणि गोवा आणि उत्तराखंड या राज्यातील मतदानाच्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा टीव्ही 9 मराठी
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालेल्या उत्तर प्रदेशमध्ये उत्तराखंड (उत्तराखंड) आणि गोव्यातील सर्व जागांसाठी मतदान झाले. तिन्ही राज्यांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवलेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार गोवा विधानसभा निवडणुकीसाठी बंपर मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 75 टक्के मतदान झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदान झाले.
मतदानानंतर भाजपच्या लोकांचे बारा वाजतील
अखिलेश यादव यांची भाजवर टीका
उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात 09 जिल्ह्यांतील 55 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. दुपारी 03 वाजेपर्यंत 55 जागांवर एकूण 51.93% मतदान झाले आहे.
चार वाजता घेणार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असतानाच भाजपच शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे
मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्वाखाली भेटणार शिष्टमंडळ
सहारनपूरमधील निवडणूक अधिकारी राशिद अली खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते सडक दुधली येथील एका शाळेत शिक्षक होते आणि नकूड विधानसभेतील सरसावा येथील बुथ क्रमांक 227 मध्ये कर्तव्यावर होते. रशीद अली खान हे कैलासपूरचे रहिवासी होते.
समाजवादी पक्ष बोगस मतदानाबाबत सातत्याने आरोप करत आहे. मुरादाबादनगर विधानसभा-28, बूथ-33, 36 येथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाने कृपया दखल घेऊन निष्पक्ष मतदानाची खात्री करावी. अशी मागणीही केली आहे.
मुरादाबाद नगर विधानसभा-28, बूथ-33, 36 पर फर्जी वोटिंग की हो रही है। जिला प्रशासन और चुनाव आयोग कृपया संज्ञान लेते हुए निष्पक्ष मतदान कराना सुनिश्चित करे। @ECISVEEP @ceoup @DMMoradabad
— Samajwadi Party (@samajwadiparty) February 14, 2022
Goa Poll Percentage Update : गोव्यात 1 वाजेपर्यंत पर्यंत 44.62 टक्के मतदान झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. लोकशाहीच्या उत्सवानिमित्त मतदारांनी बाहेर प
Goa Poll Percentage Update : गोव्यात सकाळी 11 पर्यंत 26.62 टक्के मतदान झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. लोकशाहीच्या उत्सवानिमित्त मतदारांनी बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यातील असमोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवारी हरेंद्र उर्फ रिंकू यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पहिल्यांदा त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
UP Election Voting Update : उत्तर प्रदेशमध्ये 11 वाजेपर्यंत 23 टक्के मतदान
उत्तर प्रदेशमध्ये 11 वाजेपर्यंत 23 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. समाजवादी पार्टीनं काही ठिकाणी महिलांना मतदान करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.
Uttarakhand Election Percentage Update : उत्तराखंडमध्ये 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
हरीश रावत यांनी मतदानादरम्यान ट्विट करुन एक मोठा दावा केला आहे. यावेळी ऐतिहासिक मतदान होणार आहे. राज्याबाहेर गेलेले लोक मतदानासाठी राज्यात परत येत आहेत, असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 9.45 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
दूसरे चरण के अंतर्गत 09 जनपदों में पूर्वाह्न 09 बजे तक कुल औसतन मतदान 9.45% रहा।#ECI#विधानसभाचुनाव2022#AssemblyElections2022 #GoVote #GoVoteUP #GoVoteUP_Phase2 pic.twitter.com/kDFjDL69ZD
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 14, 2022
Uttarakhand Poll Percentage : उत्तराखंडमध्ये 9 पर्यंत 5 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. उत्तराखंडमध्ये 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.
Voter turnout till 9 am |#GoaElections2022 – 11.04%#UttarPradeshElections – 9.45%#UttarakhandElections2022 – 5.15% pic.twitter.com/1SQldgxc1I
— ANI (@ANI) February 14, 2022
Goa Voting Percentage Updates : गोव्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.04 टक्के मतदान झाल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
Bijnor Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 9.2 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Amroha Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 11 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
Bareilly Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये सकाळी 9 पर्यंत 8.31 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Uttarakhand Election Updates : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सपत्निक मतदान केलं. उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलंय.
Uttarakhand Election Updates : उत्तराखंडच्या विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त सरकार गरजेचं : पुष्कर धामी
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार उत्तराखंडला विकासाच्या बाबतीत पुढं नेईल. त्यामुळं मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय.
एक भ्रष्टाचार और तुष्टिकरण से मुक्त सरकार ही देवभूमि उत्तराखण्ड के विकास, गौरव और सम्मान को आगे ले जा सकती है।
इसलिए मैं उत्तराखण्ड के सभी मतदाताओं से अपील करता हूँ कि आप मतदान करके प्रदेश के विकास और प्रगति में सहभागी बने।
पहले मतदान, फिर जलपान। pic.twitter.com/S0nS6iBwgU
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) February 14, 2022
उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. रामपूरमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी केलं मतदान
सर्वांनी लवकरात लवकर मतदान करा उत्पल पर्रीकर यांच्याकडून मतदारांना आवाहन
मतदानाचा अधिकार वापरावा
मला विजयाची पूर्ण खात्री लोकांचा मला पूर्ण पाठिंबा
भाजप ची टक्कर वाटते का या विषयावर बोलण्यास नकार
आज मतदान आहे त्यामुळे फक्त एवढेच सांगेन आज फक्त लोकांनी बोलावं
हिमाचलच्या राज्यपालांकडून गोव्यात मतदान
Himachal Pradesh Governor Rajendra Vishwanath Arlekar casts his votes at polling booth number 7 of Vasco da Gama Assembly Constituency#GoaElections2022 pic.twitter.com/VOkaATQMns
— ANI (@ANI) February 14, 2022
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नरेंद्र मोदी यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही या निवडणुकीत 22 पेक्षा जादा जिंकणार असून भाजप सत्ता बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलं.
उत्तर प्रदेशातील अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी मतदान केलं. त्यांनी यावेळी 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचं म्हटलं. शाहजहांपूरमध्ये 6 जाागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेश: राज्य में विधानसभा चुनाव के दूसरे चरण का मतदान शुरू हुआ। शाहजहांपुर में राज्य के वित्त मंत्री सुरेश खन्ना मंदिर में दर्शन के लिए पहुंचे। बाद में उन्होंने मतदान केंद्र पहुंचकर वोट दिया।
उन्होंने कहा, “हम 300 से ज़्यादा सीटें जीतेंगे। शाहजहांपुर में 6 सीटें जीतेंगे। pic.twitter.com/oinrWTXa84
— ANI_HindiNews (@AHindinews) February 14, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदानाचं आवाहन
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव के दूसरे दौर के साथ ही आज उत्तराखंड और गोवा की सभी विधानसभा सीटों के लिए वोटिंग है। सभी मतदाताओं से मेरी विनती है कि वे लोकतंत्र के इस पावन उत्सव के भागीदार बनें और मतदान का नया रिकॉर्ड बनाएं। याद रखें- पहले मतदान, फिर अन्य कोई काम!
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2022
गोव्यात मतदानाला सुरुवात
Goa Governor PS Sreedharan Pillai and his wife Reetha Sreedharan cast their votes at polling booth number 15 of Taleigao Assembly Constituency#GoaElections2022 pic.twitter.com/IGhPWBS04O
— ANI (@ANI) February 14, 2022
गोव्यात मतदानासाठी पूर्वतयारी सुरु
Preparations underway ahead of voting for the #GoaElections2022 which will begin shortly
Visuals from polling booth number 15 of Taleigao Assembly Constituency pic.twitter.com/VwrFYYenqe
— ANI (@ANI) February 14, 2022
गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी ताकद लावली आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचारात हजेरी लावली. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे आज होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.
उत्तर प्रदेशमधून वेगळं झालेलं राज्य म्हणजे उत्तराखंड होय. या राज्यातील पाचवी विधानसभा निवडणूक यावर्षी पार पडत आहे. उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रचाराची मुदत शनिवारी संपली असून 14 फेब्रुवारीला 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, शाहजहांपूर या जिल्ह्यातील 55 विधानसभा मतदारासंघाठी मतदान पार पडेल. यासाठी 586 उमदेवार मतदानाच्या रिंगणात आहेत. तर, 12538 मतदान केंद्रावर मतदानाची पक्रिया पार पडेल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.