कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन सत्तेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांना सत्तेत आणण्यासाठी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांनी डावपेच आखले होते. हे डावपेच यशस्वी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांची ही घोषणा देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आहे. (Prashant Kishor announces he is quitting his profession of devising poll strategy)
प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेशी चर्चा करताना ही माहिती दिली आहे. आता निवडणूक रणनीती बनविण्याचं काम मी सोडणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, पुढे काय करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. ममता बॅनर्जी याच बंगालमध्ये सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या विजयामागे प्रशांत किशोर यांचं मोठं योगदान आहे. बंगालमध्ये भाजप ट्रिपल डिजीट म्हणजे तीन आकडी संख्या गाठणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे भाकीत खरं ठरताना दिसत आहे.
ते ट्विट
भाजप 100 जागा जिंकल्यास मी राजकीय रणनीती करणं सोडून देईल, असं आव्हानच प्रशांत किशोर यांनी दिलं होतं. तसं ट्विटच त्यांनी केलं होतं. मीडियाने कितीही गवगवा केला तरी बंगालमध्ये भाजपच दोन अंकी आकडाही गाठणार नाही. हे ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपने यापेक्षा चांगली कामगिरी केली तर मी निवडणूक डावपेच आखण्याचं कामच सोडून देईल, असं ते म्हणाले होते.
भाजपकडून क्लिप व्हायरल
दरम्यान, मधल्या काळात भाजपने प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एवढेच लोकप्रिय आहेत, असं म्हटल्याचा दावा करण्यात आला होता. प्रशांत किशोर यांनी या ऑडिओ क्लिपवरूनही भाजपला आव्हान दिलं होतं. संपूर्ण ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचं आव्हानच त्यांनी भाजपला दिलं होतं.
ममताच सत्तेत?
दरम्यान, बंगालमध्ये भाजपला शंभर सुद्ध जागा मिळताना दिसत नाहीत. तर ममता बॅनर्जी यांना दोनशेहून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. प्रशांत किशोर यांनी बंगाल निवडणुकीसाठी ममता दीदींना डावपेच आखून दिले होते. त्याचा परिणाम दिसत असून ममता दीदी पुन्हा सत्ते येण्याची चिन्हे दिसत आहेत. (Prashant Kishor announces he is quitting his profession of devising poll strategy)
VIDEO : Election Results 2021 Live : तृणमूलला बहुमतासाठी 7 जागांची गरज#Pandharpurbyelections #PandharpurElectionResults #AssemblyElections2021 #TamilNaduElections2021 #WestBengalElections2021 #AssamPolls2021 #Keralaelections #PuducherryElections2021 pic.twitter.com/vQEQEPw4Es
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
संबंधित बातम्या:
जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत
(Prashant Kishor announces he is quitting his profession of devising poll strategy)