West Bengal Election Results 2021: बंगालवरील स्वारीचं भाजपचं स्वप्नं का भंगलं?; प्रशांत किशोर यांनी दिलं ‘हे’ कारण

| Updated on: May 02, 2021 | 5:41 PM

पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करू असा दावा भाजपने केला होता. (West Bengal Election Results 2021: prashant kishor tells bjp took tmc garbage in bengal )

West Bengal Election Results 2021: बंगालवरील स्वारीचं भाजपचं स्वप्नं का भंगलं?; प्रशांत किशोर यांनी दिलं हे कारण
Prashant Kishor
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करू असा दावा भाजपने केला होता. मात्र, भाजप तीन अंकी संख्या गाठणारच नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला? त्याचं उत्तरही प्रशांत किशोर यांनी दिलं आहे. (West Bengal Election Results 2021: prashant kishor tells bjp took tmc garbage in bengal )

प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेशी बोलताना यापुढे निवडणूक रणनीतीचं काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला पराभवाला का सामोरे जावं लागलं याचं विश्लेषणही केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांनी काही चुका केल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली नाही. तर भाजपने लोकसभा निवडणुकीत जी रणनीती आखली होती, तीच रणनीती त्यांनी विधानसभा निवडणुकीत वापरली. त्याचं भाजपला मोठं नुकसान झाल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

टीएमसीचा कचरा भाजपमध्ये

भाजपने लोकसभा निवडणुकीत जय श्रीरामचा नारा दिला होता. आताही त्यांनी तेच केलं. तर ममता बॅनर्जी यांनी आपल्या चुकांमध्ये बदल केला आहे, असं ते म्हणाले. त्याशिवाय ममता बॅनर्जी यांना सोडून त्यांचे जे सहकारी भाजपमध्ये गेले त्यांची खूप चर्चा झाली. मीडियाने त्यांच्यावर बराच फोकस ठेवला. इतके नव्हे तर टीएमसी फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, त्यातील वास्तव वेगळंच होतं. टीएमसीमधील जो कचरा होता, तो भाजपने स्वत:कडे ठेवला. टीएमसीला सोडून गेलेल्यांपैकी सर्वाधिक लोक भ्रष्टाचारी होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. तसेच काही लोकांना तर जनाधारही नव्हता, अशा लोकांना भाजपने जवळ केलं, असं ते म्हणाले.

भाजप बदलली नाही

कोणताही विजय दुसऱ्यांपेक्षा सक्षम करत नाही. परंतु, भाजपने गेल्या 4-5 वर्षापूर्वी जिथून सुरुवात केली, त्याच ठिकाणी भाजप आहे. भाजपने स्वत:मध्ये बदल केला नाही, असं ते म्हणाले. धार्मिक ध्रुवीकरणावरही त्यांनी भाष्य केलं. कोणताही समुदाय 50 टक्क्यांपेक्षा अधिक एकत्र येत नाही, असं ते म्हणाले. (West Bengal Election Results 2021: prashant kishor tells bjp took tmc garbage in bengal )

 

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results 2021: प्रशांत किशोरचा आणखी बाँबगोळा; मी विजयात आता हे सगळं सोडू इच्छितो!

जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा पराभव

(West Bengal Election Results 2021: prashant kishor tells bjp took tmc garbage in bengal )