गोवा – गोव्यात (goa) विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यापासून गोव्यातलं सुध्दा राजकारण तापलं आहे. तसेच सद्या सत्तेत असलेल्या भाजपने (bjp) गोव्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी चांगलीत कंबर कसलेली आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि प्रफुल पटेल (praful patel ) यांनी सुध्दा गोव्यात चांगलीचं राजकीय फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकवेळी पारंपारिक पध्दतीने निवडणुक लढवत असते. पण महाराष्ट्रात जसं सरकार आहे. तसं गोव्यात असावं असं वाटतं असल्याने आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या गोव्यातील नेत्यांना वेगळी हवा लागली आहे.
प्रत्येक पार्टीचा एक विचार ठरलेला असतो, तरीपण आम्ही एकमेकांचे आचारविचार पाळून महाराष्ट्रात एकत्र आहोत. तसंच गोव्यात राहण्याचा आम्ही प्रयत्न करू, गोव्यात सगळ्या जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार नसून मोजक्या निवडून येणाची शक्यता असलेल्या जागेवर आमचा उमेदवार असेल. आम्हाला घेतल्याशिवाय इथं सरकार बनू शकतं नाही असंही प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
मुंबईत ज्यावेळी ममत बॅनर्जी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. तेव्हा त्या म्हणटल्या होत्या की, सगळ्यांनी एकत्र यायला हवं त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असंही प्रफुल पटेल म्हणाले. गोव्यात ज्यांना सरकार बनवायचं आहे, त्यांना आमची मदत घ्यावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं.