मुंबई : 25 जून 1983 हा इतिहासातील असा क्षण आहे जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. तो दिवस होता जेव्हा कपिल देव यांच्या संघाने क्रीडा इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी केली – फक्त क्रिकेटच नाही – तर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज केल्यानंतर, अलीकडेच चित्रपटातील 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या आठवणींचा आणखी एक व्हिडिओ रिलीज केला.
नक्की काय आहे त्या व्हिडीओमध्ये
ज्यामध्ये त्यांनी 1983 च्या ऐतिहासिक सामन्यातील एक अविश्वसनीय किस्सा शेअर केला, ज्यामध्ये ते एक असा चेंडू टाकण्यात यशस्वी झाले ज्याने फलंदाज आश्चर्यचकित झाला आणि ते संघासाठी शानदार विश्वचषक जिंकण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले.
38 years later, the mystery still remains unsolved!
83 RELEASING IN CINEMAS ON 24TH DEC, 2021, in Hindi, Tamil, Telugu, Kannada and Malayalam. Also in 3D.#ThisIs83 pic.twitter.com/zZzXbdksMV
— 83 (@83thefilm) December 15, 2021
कबीर खान यांच्याद्वारे दिग्दर्शित ’83 वर्षातला सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट भारताच्या ऐतिहासिक 1983 च्या विश्व कप विजयाची कहाणी आहे. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.
Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश
Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!