नवीन वर्षाची सुरुवात आता लवकरच होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. 2024 मध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक करणारे सिनेमे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली केली असून चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केली होती. या यादीमध्ये सुकुमारच्या पुष्पा 2 पासून ते पंकज त्रिपाठीच्या स्त्री 2 पर्यंतच्या नावांचा समावेश आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीचा कमाईचा तपशील.
पुष्पा 2
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांचा चित्रपट पुष्पा 2: द रुल 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. Sacknilk च्या वृत्तानुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 164.25 कोटींची कमाई केली आहे. सुकुमारच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहे. तसेच 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी हा चित्रपट एक ठरला आहे. पुष्पा पार्ट 2 ने प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्या आठवड्याभरात 1100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला त्याचबरोबर या चित्रपटाच्या जगभरातील कमाईने 1500 कोटींचा आकडा पार केला आहे.
कल्की 2898
दीपिका पादुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन हे स्टार्स असलेला चित्रपट कल्की 2898 हा देखील या यादीत समाविष्ट आहे. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने एकूण 114 कोटी रुपये कमावले होते. तसेच जगभरात या चित्रपटाने 177.70 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट 2024 ला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.
देवरा
देवरा चित्रपटाचा पार्ट वन पाहण्याची क्रेझ पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये दिसून आली. भारतात या चित्रपटाने पहिल्या दिवशी 98 कोटी रुपये कमवले होते. त्याचबरोबर जगभरात या चित्रपटाने पहिल्या दिवशी 142 कोटींची कमाई करण्यात यश मिळवले.
स्त्री 2
श्रद्धा कपूर,य पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव हे स्टार्स असलेला स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. Sacknilk च्या वृत्तानुसार भारतामध्ये पहिल्या दिवशी या चित्रपटाने 54.35 कोटींची कमाई केली आहे.
सिंघम अगेन
बहुप्रतिक्षित असलेला चित्रपट सिंघम अगेन यावर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्ये अर्जुन कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आवडल्या आहेत. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी 48.50 कोटींची कमाई केली.