Fighter | भारताच्या शौर्याची कथा, प्रदर्शनाआधी हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटासाठी वाईट बातमी

| Updated on: Jan 24, 2024 | 11:25 AM

Fighter | हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला 'फायटर' चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. पण त्याआधी या चित्रपटासाठी एक वाईट बातमी आहे. रिलीजला 24 तासापेक्षा कमीवेळ उरलाय. बिजनेस एक्सपर्ट गिरीश जोहर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

Fighter | भारताच्या शौर्याची कथा, प्रदर्शनाआधी हृतिक रोशनच्या फायटर चित्रपटासाठी वाईट बातमी
hrithik roshan look in fighter
Follow us on

Fighter Ban | मागच्यावर्षी शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ब्लॉगबस्टर ठरला होता. याच चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. यावेळी सिद्धार्थच्या चित्रपटाचा नायक हृतिक रोशन आहे. त्याच्यासोबत लीड रोलमध्ये दीपिका पादुकोण आहे. फिल्मच्या रिलीजला 24 तासापेक्षा कमीवेळ उरलाय. पण या चित्रपटासंदर्भात एक वाईट बातमी आहे. हृतिक रोशन ‘फायटर’ चित्रपट पाच मोठ्या देशांमध्ये रिलीज होणार नाहीय. या देशांनी ‘फायटर’ चित्रपटावर बंदी घातली आहे. या बॅनच कारण अजून समोर आलेलं नाहीय. अन्य डिटेल्सची प्रतिक्षा आहे.

बिजनेस एक्सपर्ट गिरीश जोहर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. पाच आखाती देशांनी हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटावर बंदी घातली आहे. फक्त UAE मध्ये फायटर चित्रपट रिलीज होईल. तिथल्या सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट PG15 रेटिंगसह पास केला आहे.

खाडी सहयोग परिषदमध्ये कुठले-कुठले देश?

खाडी सहयोग परिषद GCC (Gulf Cooperation Council) मध्ये बहरीन, कुवेत, ओमान, कतर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीराती आहे. यात UAE सोडून सर्व देशांनी ‘फायटर’ चित्रपटावर बंदी घातली आहे. भारतीय चित्रपटांच्या परदेशातील कलेक्शनमध्ये खाडी देशांचा चांगला वाटा असतो. मिडल ईस्ट भारतीय चित्रपटांसाठी एक चांगल मार्केट आहे. रिपोर्ट्सनुसार ‘फायटर’ चित्रपटाच बजेट 250 कोटींच्या आसपास आहे. अशावेळी मोठ्या मार्केट्समधून कमाईचा ओघ आटण याचा ‘फायटर’च्या प्रदर्शनावर परिणाम होईल.

एअर फोर्सच्या फायटर पायलटची गोष्ट

हृतिक रोशन, दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘फायटर’ एअर फोर्सच्या फायटर पायलटची गोष्ट सांगतो. पाकिस्तानात घुसून एक दहशतवादी तळ उडवण्याच त्यांच मिशन आहे. बालाकोट एअरस्ट्राइकवर या चित्रपटाच कथानक आधारलेलं आहे. हृतिक आणि दीपिकासोबत या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय सुद्धा आहेत.