मुंबई : सिनेमाप्रेमींसाठी एक नाही अनेक आनंदाच्या बातम्या आहे. कारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला एकापेक्षा एक अनेक सिनेमे मोठ्या पदद्यावर प्रदर्शित होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक सिनेमे रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये हॉरर, रोन्मस सोबतच ॲक्शनचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सोमवारी सुरु होत असलेल्या आठवड्यात दोन हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हिंदी शिवाय तमिळ, कन्नड, मल्याळम तसेच इतर भाषांमधील अनेक उत्कृष्ट सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तर आज जाणून घेवू २७ फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची संपूर्ण यादी पाहू या…
यंदाच्या आठवड्यात तीन दमदार सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तीन सिनेमांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण या सिनेमांमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर ‘लापता लेडीज’ सिनेमाच्या माध्यमातून किरण राव तब्बल १२ वर्षांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुन्हा पाय ठेवणार आहेत. सिनेमात नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांची मुख्य भूमिका असणार आहे.
तर दुसरीकडे, ‘शशांक’, ‘गांधीगीरी’, राम की जन्मभूमि’, ‘लफंगे नवाब’, ‘काशी टू कश्मीर’ यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले सिनेमे साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक सनोज मिश्र यांचा ‘गजनवी’ सिनेमा देखील प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.
‘गजनवी’ सिनेमात राणवीर सिंग, हेरम्ब त्रिपाठी, तान्या मिश्रा, आर. के सिंह, वीरेंद्र कमांडो, आदित्य रॉय, नवीन शर्मा, दीपक सूठा, अनिल अंजुनिल, ब्रजेश सिंह यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तीन मार्च रोजी तमिळ भाषेतील पाच सिनेमे एकत्र मोठ्या पडद्यावर धडकणार आहेत. ‘पुली’, ‘इनकार’, ‘बलगम’, ‘गीतासक्षिगा’ आणि ‘आर्गेनिक मामा हायब्रिड अल्लुदु’ सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.
तमिल भाषेसोबतच कन्नड सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळणार आहे. यंदाचा आठवडा कन्नड प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कारण ‘दूरदर्शन’, ‘एम्बेसडर’, ‘प्रजराज्य’, ‘कदाला थीरादा भार्गवा’, ‘19.20.21’, ‘नाकुमुखा’, ‘बेगा’ सिनेमे मोठ्या पडद्यावर धडकणार आहेत.
सिनेमाप्रेमींना हॉलिवूड सिनेमांचा देखील अनुभव घेता येणार आहे. तीन मार्च रोजी ‘क्रीड 111’, ‘ट्रांग्लेस ऑफ सॅडनेस’ आणि ‘द इटरनल डॉटर’ सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.