मुंबई – फिल्म पुष्पा (pushpa) या चित्रपटासोबत त्या चित्रपटातील गाणी सुध्दा सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीला पडली आहेत. त्यावर सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून तयार करण्यात आलेले व्हिडीओ आपण पाहतोय. तसेच लाखो लोकांनी ‘ऊं अंटावा’ और ‘श्रीवल्ली’ ‘सामी सामी’ या गाण्यांचे रिल्स बनवले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सारखे डोळ्यासमोर येत आहेत. ‘ऊं अंटावा’ या गाण्याला गणेश आचार्य (ganesh acharya) यांनी कोरियोग्राफ केलं असून देवी श्री प्रसाद यांनी त्याला म्युझिक दिलं आहे. हे ज्यावेळी हे गाण तयार केल जातं होतं. त्यावेळी तिथल्या कुणालाही इतकं गाणं प्रसिध्द होईल असं वाटलं नव्हतं.
असं तयार झालं गाणं
ज्यावेळी गणेश आचार्य यांनी ईटाइम्सला एक मुलाखत दिली. त्यावेळी ‘ऊं अंटावा’ गाणं तयार करण्यामागं एक गुपित आहे असं सांगितलं. अल्लु अर्जुन आणि सामंथा यांच्याकडून गाणं तयार करण्यासाठी दोन दिवस चांगली प्रॅक्टीस करून घेतली. त्यानंतर तिस-या दिवशी ते गाणं शुट करण्यात आलं. गणेश आचार्य यांनी आतापर्यंत हटके गाणी तयार केली आहेत. आपण गाण्याला जोडलेल्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत.
‘ऊं अंटावा’ हे गाणं तयार करताना सामंथा होती नाराज
‘ऊं अंटावा’ गाण्याच्या शुटिंग दरम्यान सामंथा अधिक नाराज होती. हे गणेश आचार्य यांनी ईटाइम्सला सांगितले आहे. अचानक हे गाणं तयार करण्याचं ठरवण्यात आलं. सामंथाला अजिबात माहिती नव्हतं की मी या गाण्याचा कोरिओग्राफर आहे. गणेश आचार्य यांना पुर्वी या गाण्यासाठी साईन केलं होतं. परंतु मध्यतंरीच्या काळात त्यांची चर्चा नव्हती. अखेरीस हे गाणं त्याच्याकडून करून घेण्यात आलं.
गणेश आचार्य यांनी ऑपरेशन ढकललं पुढं
अचानक गणेश आचार्य यांनी गाण्यासाठी बोलावण्यात आलं, पण त्यावेळी गणेश आचार्य यांनी माझं डोळ्यांचं ऑपरेशन असल्याचं सांगितलं. पण दोन-तीनवेळा फोन आल्यानंतर मी त्यांना माझ्या डॉक्टरांना मोबाईल नं दिला. त्यांनी माझ्या डॉक्टरांशी बोलून घ्या असं सांगितलं. डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिल्यानंतर मी दोन दिवसात तिथं दाखल दाखल झालो. दोन दिवस चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर मी त्यांच्याकडून गाण तयार करून घेतलं असं गणेश आचार्य यांनी ईटाइम्सला सांगितलं आहे.
सामंथाने या गाण्याला नाकारलं होतं
डायरेक्टर सुकुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, सामंथाने या गाण्याला नकार दिला होता. तिने असं सांगितलं होतं की मला या गाणयाचा हिस्सा बनायची इच्छा सुध्दा नाही. पण त्यानंतर डायरेक्टरने सामंथाला काही गोष्टी समजून सांगितल्या आणि गाणं करण्यास भाग पाडलं. या गाण्यासाठी सामंथाने 5 करोड रूपये घेतल्याची चर्चा आहे.