मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, वादग्रस्त प्रसंगांमुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करत अभिनेत्री वादाच्या भावऱ्यात अडकलेल्या असतात. एवढंच नाही तर, यामुळे पोलिसात अभिनेत्रींवर गुन्हे देखील दाखल करण्यात येतात. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री आहे, जिच्यावर एक दोन नाही तर, तब्बल 700 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर खुद्द कंगना हिने देखील वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. आता देखील कंगना तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
कंगना हिच्यावर देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये 700 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर खुद्द अभिनेत्री स्पष्टीकरण दिलं होतं. ‘ही परिस्थिती मला एकटीला सांभाळावी लागणार आहे. शिवाय आगामी सिनेमांची कामे देखील मलाच पहायची आहेत. पण या सर्व गोष्टी एकटीने सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
कंगना हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्रीने एका मुलाखतीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत सिनेमात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. जर सिनेमात माझी भूमिका खान अभिनेत्यांच्या बरोबरीची असेल तरच मी त्यांच्यासोबत एकत्र स्क्रिन शेअर करण्यास तयार होईल. असं कंगना म्हणाली.. पण आजपर्यंत कोणत्याच प्रसिद्ध खान अभित्रीने भूमिका साकारलेली नाही.
कंगनाने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीचे काही सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस उतरले, तर काही सिनेमांमात्र अपयशाचा सामना करावा लागला. कंगना हिच्या सिनेमांची कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
कंगना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘इमर्जन्सी’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणारआहे, ज्यामध्ये अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगना हिच्यसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘इमर्जन्सी’ कंगना ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ सिनेमात देखील दिसणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा तमिळ सिनेमातील हिट हॉरर सिनेमा ‘चंद्रमुखी’ चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. ‘चंद्रमुखी 2’ मधील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.