मुंबई : ’83’ हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लालच्या भूमिकेत दिसणार आहे जिथे ते 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा विजयाला रीक्रिएट करतील. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या असेट्समध्ये कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजविषयीचा खुलासा केला. मदन लाल हे 1983 च्या विश्वचषकातील सर्वात प्रभावी गोलंदाज होते.
कोण आहे प्रमुख भुमिकेत
रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
चित्रपटातील दुसरे गाणे ही लॉन्च
महत्त्वाकांक्षी क्रीडा नाटकातील प्रेरणादायी गाणे ‘लेहरा दो’ लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी अलीकडेच रणवीर सिंग आणि इतर प्रतिभावान कलाकारांच्या ‘बिगडने दे’ चित्रपटातील दुसरे गाणे लॉन्च केले आहे.बेनी दयाल यांनी गायलेले आणि प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व टिपते, जे रणवीर सिंह आणि त्याच्या टीमने उत्तम प्रकारे चित्रित केले आहे. ‘बिगडने दे’ आपल्याला टीम इंडियाची तयारी आणि इतिहास रचण्याआधी पडद्यामागची मजा समोर आणतो.
Breaking : मृत स्वप्नील लोणकरचं मुलाखतीच्या यादीत नाव! MPSC चा संतापजनक कारभार