मुंबई : सध्या आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन देखील केले जात आहे. ड्रीम गर्ल 1 या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले होते. ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 25 आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) चित्रपटातील एक गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची क्रेझ बघायला मिळत आहे.
ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. ड्रीम गर्ल 1 चित्रपटामध्ये नुसरत भरूचा ही मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे नुसरत भरूचा आणि आयुष्मान खुराना यांच्या जोडीला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले आणि चित्रपट देखील हिट ठरला.
असे असतानाही नुसरत भरूचा हिला ड्रीम गर्ल 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि चंकी पांडेच्या लेकीला संधी देण्यात आली. ड्रीम गर्ल 2 चित्रपट रिलीज होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या लेखक आणि निर्देशक असलेल्या राज शांडिल्यवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय.
राज शांडिल्य याच्यावर चक्क चोरीचा आरोप हा लावण्यात आला आहे. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप राज शांडिल्यवर लावण्यात आलाय. इतकेच नाही तर ही पहिली वेळ नाही की, राज शांडिल्यवर चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला.
यापूर्वीही राज शांडिल्यवर चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप हा करण्यात आला होता. झांसी येथील रहिवाशी असलेले अंकुश शर्माने हा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अंकुश शर्मा हे राज शांडिल्य याचे जुने मित्र आहेत. अंकुश शर्मा म्हणाले की, मी राज शांडिल्यला लव की अरेंज मॅरिज या चित्रपटाची स्टोरी ईमेल केली होती.
आता त्यांनी त्यावर काम सुरू केले आहे. मी चित्रपटाची स्टोरी लिहिली असताना त्यांनी कुठल्याच गोष्टीची कल्पना न देता या चित्रपटावर काम सुरू केले आहे. माझी स्टोरी चोरी करण्यात आली. यावर बोलताना राज शांडिल्य म्हणाले, मुळात म्हणजे हे सर्व प्रकरण जुने आहे. इतकेच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील सुरू आहे. मी यावर जास्त काहीच बोलू शकत नाही. कोर्टाचा निकाल देखील आता लवकरच येणार आहे.