मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या राय हिचे चित्रपट सुपरहिट कामगिरी करताना देखील दिसतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या राय हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. अनेक वर्षे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना डेट केलंय. हेच नाही तर यांची लव्ह स्टोरी बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली लव्ह स्टोरी होती.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ब्रेकअप एका वाईट वळणावर नक्कीच झालंय. हेच नाही तर सलमान खान याने ऐश्वर्या रायच्या चित्रपटाच्या सेटवर येऊन दारू पिऊन धिंगाणा केल्याचे देखील सांगितले जाते. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाल्यानंतरही ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र, ऐश्वर्या राय हिला तिची एक चूक खूप महागात पडली.
रिपोर्टनुसार ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी सर्वात अगोदर ऐश्वर्या राय हिला ऑफर होती. पहिली चाॅईस या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हीच होती. मात्र, या चित्रपटाला थेट नकार ऐश्वर्या राय हिने दिला. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठीच ऐश्वर्या रायला ऑफर होती. मात्र, ऐश्वर्या राय हिने थेट नकार दिला, जो तिच्यासाठी महागात पडला. हा चित्रपट दणदणीत कामगिरी करताना दिसला.
2003 मध्येच बाजीराव मस्तानी चित्रपटाची घोषणा झाली. मुळात म्हणजे रणवीरच्या अगोदर या चित्रपटाची आॅफर सलमान खान याला होती. ऐश्वर्याला सलमान खानसोबत पुन्हा मोठ्या पडद्यावर काम करायचे होते. मात्र, अचानक रणवीरचे नाव या चित्रपटासाठी फायनल झाले. यामुळेच ऐश्वर्याने या चित्रपटाला नकार दिल्याचे सांगितले जाते.
बाजीराव मस्तानी हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने तूफान कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिस पर 356 कोटींची कमाई केली. ऐश्वर्या राय हिला या चित्रपटाला नकार देणे खरोखरच खूप जास्त महागात पडल्याचे दिसते. ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ऐश्वर्या राय चांगली कमाई करते.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काहीतरी बिनसले आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घरही सोडले आहे. यांचा घटस्फोट होणार असल्याची मध्यंतरी चर्चा देखील रंगताना दिसली. आता सलमान खान आणि ऐश्वर्याचा हा किस्सा चर्चेत आलाय.