कृष्णा सोनारवाडकर टीव्ही9 प्रतिनिधी : उर्फी जावेद हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्या विरोधात थेट मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एक व्हिडीओ करणे उर्फी जावेद हिला चांगलेच महागात पडल्याचे दिसतंय. नुकताच उर्फी जावेद हिच्या विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा व्हिडीओ बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आता उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ आज सकाळपासूनच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. छोटे कपडे घातल्याने पोलिसांकडून उर्फी जावेदला अटक असा व्हिडीओ उर्फी जावेदने तयार केला होता. मात्र, तो व्हिडीओ फेक होता आणि स्वत: उर्फी जावेद हिनेच तयार केला. आता तोच व्हिडीओ उर्फी जावेद हिच्या अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.
आज दिवसभर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा उर्फी जावेद हिला एकप्रकारे मोठा झटका नक्कीच आहे. फक्त उर्फी जावेद हिच नाही तर ओशिवारा पोलिसांनी उर्फी जावेद आणि दोन अनोळखी महिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.उर्फी जावेदने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तोतया पोलीस निरिक्षकला अटक करण्यात आलीय.
व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केलेली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका कॅफेमध्ये उर्फी जावेद ही बसलेली आहे आणि तिथे दोन महिला पोलिस या येतात. पुढे त्या उर्फी जावेद हिला म्हणतात की, तुला पोलिस स्टेशनमध्ये यावे लागले. यावेळी उर्फी जावेद ही त्यांना कारण विचारताना दिसत आहे कपड्यांमुळे यावे लागणार हे सांगताना त्या पोलिस दिसत आहेत.
इतकेच नाही तर थेट या महिला पोलिस उर्फी जावेद हिला काळ्या रंगाच्या गाडीमध्ये घेऊन जाताना देखील दिसत आहेत. या गाडीच्या मागे पोलिस असे लिहिलेले दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, खरोखरच मुंबई पोलिस हे उर्फी जावेद विरोधात अॅक्शनमध्ये आल्याचे दिसत आहेत. उर्फी जावेदच्या समस्यांमध्ये वाढ झालीये.