मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरातून गेल्या दोन आठवड्यांपासून कोणीही बाहेर गेले नाहीये. बिग बॉस 17 च्या घरातून या आठवड्याला कोणी बाहेर पडणार की नाही अशी चर्चा आहे. परंतू, नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती ही सांगण्यात आलीये. यामुळे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या घरातून या आठवड्याला कोणी एक व्यक्ती नाही तर एक संपूर्ण ग्रुपच बाहेर पडणार असल्याचे सांगितले जातंय. यामुळे सर्वचजण हैराण झाले असून मोठी खळबळ बघायला मिळतंय.
रिपोर्टनुसार टीआरपीमध्ये धमाका करण्यासाठी निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतलाय. जे लोक बिग बाॅस 17 च्या घरात काही खास कामगिरी करत नाहीत, अशांना थेट बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे घरातील एक मोठा ग्रुपच बाहेर पडणार आहे. हा खरोखरच एक खूपच जास्त मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल.
बिग बॉस 17 मधून नेमका कोणता ग्रुप हा बाहेर पडणार हे मात्र, अजूनही कळू शकले नाहीये. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये बदल केला आहे. मात्र, तरीही म्हणावा तसा धमाका बिग बॉस 17 ला टीआरपीमध्ये करण्यात आला नाहीये. यामुळेच हे बदल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे यांच्याऐवजी घरात कोण दाखल होणार याचे देखील काही नावे ही पुढे आली आहेत. बिग बॉस 17 च्या घरात आता फ्लोरा सैनी, पूनम पांडे, तस्नीम नेरुरकर, भाविन भानुशाली आणि क्रिकेटर जहांआरा आलम हे सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. यामुळेच बिग बॉस 17 च्या घरात पुढील काही दिवसांमध्ये धमाके होताना दिसणार हे नक्की आहे.
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. ऐश्वर्या शर्मा ही देखील पती निल भट्ट याच्यासोबत सहभागी झाली आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे सातत्याने बघायला मिळत आहेत. नुकताच सलमान खान याने अंकिता लोखंडे हिचा क्लास लावला.