मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं (Monsoon) आता सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण केली आहे सोबतच वातावरणही आता प्रसन्न झालं आहे. अशा पावसात सुंदर वातावरणात झी म्युझिक तुमच्यासाठी एक खास भेट घेऊन आलं आहे. या प्रसन्न वातावरणासारखच आनंद देणारं नवं गाणं आता तुमच्या भेटीला आलं आहे. ‘झिम्माड’ हे श्रवणीय गीत नुकतंच झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे. गायिका अमृता नातूनं हे गाणं संगीतबद्ध करून गायलं आहे.
गायिका आणि संगीतकार अमृता नातूचा म्युझिक व्हिडीओ
गायिका आणि संगीतकार अमृता नातूनं आतापर्यंत सिंगल म्युझिक व्हिडीओतून वेगवेगळ्या प्रकारची गाणी केली आहेत. ‘झिम्माड’ हे गाणंही असंच श्रवणीय आणि आनंददायी आहे. सुचेता जोशी अभ्यंकर यांच्या शब्दांना अमृतानं संगीतबद्ध करून गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अजिंक्य देशमुखनं केलं आहे. संतोष नायर यांनी संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंगची जबाबदारी निभावली आहे. उत्तम शब्द, रिफ्रेशिंग चाल, नेत्रसुखद छायांकन ही या म्युझिक व्हिडीओची वैशिष्ट्य आहेत.
पाहा गाणं
गायिका-संगीतकार अमृता नातूनं व्यक्त केल्या भावना
म्युझिक व्हिडीओविषयी गायिका-संगीतकार अमृता नातू म्हणाली, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच नकारात्मक परिस्थिती आहे. असं असलं तरी निसर्ग दरवर्षीप्रमाणेच प्रसन्न आहे. सर्वत्र पडलेल्या पावसानं हिरवाई दाटली आहे, एकदम रिफ्रेशिंग वातावरण आहे. हेच वातावरण शब्द, संगीत आणि छायांकनातून टिपण्यात आलं आहे. त्यामुळे रसिकांना याच रिफ्रेशिंग वातावरणाचा अनुभव आणि आनंद देण्याचा प्रयत्न या म्युझिक व्हिडीओद्वारे केला आहे.
संबंधित बातम्या
Himachal Pradesh Trip : मिताली मयेकरची जुईली आणि नचिकेतबरोबर हिमाचल सफर, पाहा सुंदर फोटो