मुंबई : आमिर खान याची लेक इरा खान ही कायमच चर्चेत असते. नुकताच इरा खान हिचे लग्न नुपूर शिखरे याच्यासोबत अत्यंत शाही पद्धतीने राजस्थान येथे पार पडले. आता इरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाला जवळपास एक महिना झालाय. काल इरा खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. लग्न होऊन एक महिना झालेल्या असतानाच अशाप्रकारची पोस्ट ही इरा खान हिने शेअर केली.
आता परत एकदा इरा खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये इरा खान ही भावूक झाल्याचे बघायला मिळतंय. इरा खान हिने काही फोटोही या पोस्टसोबत शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना इरा खान हिच्या मनात बऱ्याच काही गोष्टी या सुरू असल्याचे बघायला मिळतंय.
इरा खान हिने आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये इरा खान ही किरण राव म्हणजेच तिच्या सावत्र आईची गळाभेट घेतना दिसत आहे. हे काही फोटो शेअर करत तिने म्हटले की, मला या आठवड्यामध्ये समजले की, मी खूप जास्त आभारी आहे की, माझ्या आयुष्यात असे पाच लोक आहेत.
ज्यांना मी कधीही बोलावू शकते. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी त्यांची गळाभेट घेऊ शकते. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी त्यांना कधीही काॅल करू शकते. जर तुम्हाला वाटले की, असे नाहीये..तर त्यांना शोधा…मग तुम्हाला जर वाटते की, असे कोणी लोकच तुमच्याकडे नाहीत. मग अशावेळी तुम्ही सरळ बाहेर पडा आणि कलेक्शन तयार करा.
मेडिकेशन किंवा थेरपी यांची जागा कोणी घेऊ शकत नाहीत. आता इरा खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. इरा खान हिच्या अशाप्रकारच्या पोस्ट पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. इरा खान हिच्या आयुष्यात काहीतरी सुरू असल्याची अंदाजा या पोस्टवरून लावला जातोय. इराच्या अशाप्रकारच्या पोस्ट पाहून लोक हैराण होताना दिसत आहेत.