‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा आज फिनाले पार पडतोय. या सीजनची सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांच्यासारखे मोठे कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले. दुसरीकडे प्रचंड वाद आणि विवाद या सीजनमध्ये बघायला मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या निर्मात्यांनी दिलेल्या टास्कमध्ये अनेकदा जोरदार भांडणे करताना दिसले. परिणामी निर्मात्यांना अर्ध्यापेक्षा अधिक टास्क हे रद्द करावे लागत. फक्त हेच नाही तर बऱ्याचदा टास्कमध्ये घरातील सदस्यांना दुखापत देखील झालीये. बिग बॉसच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच एक घोषणा करत सांगितले की, बिग बॉस मराठीचे सीजन यंदा 70 दिवसांमध्येच संपणार आहे.
फक्त हेच नाही तर यासोबतच त्यांनी 6 ऑक्टोबर 2024 रोजीच बिग बॉसचा फिनाले होणार असल्याचे जाहीर केले. बिग बॉस सीजन 18 मुळेच निर्मात्यांना असा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा देखील होती. आता अवघ्या काही मिनिटांमध्येच बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला सुरूवात होईल. रितेश देशमुख हा फिनालेला होस्ट करताना दिसेल.
सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या प्रोमोचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये घरातीस सर्वच सदस्य हे धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निकी तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, धनंजय पोवार यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये निकी तांबोळी आणि जान्हवी यांचा जलवा बघायला मिळतोय. दोघीही जबरदस्त असा डान्स करत आहेत. या व्हायरल होणाऱ्या प्रोमोवरून स्पष्ट दिसत आहे की, बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले हा धमाकेदार नक्कीच होणार. आज अखेर 70 दिवसांनंतर बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही देखील केली जाईल.