हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman ने का स्वीकारला इस्लाम धर्म ? नाव बदलण्याचं कारण काय ?

| Updated on: Jan 06, 2024 | 8:49 AM

प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक AR Rahman यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते - पण त्यांचं खरं नाव अनेकांना माहीत नसेल. मूळच्या हिंदू कुटुंबात जन्मलेल्या रहमानने इस्लाम धर्म का स्वीकारला ? असं नेमकं काय घडलं की त्यांनी हिंदू धर्म सोडला? नाव का बदललं ? चला जाणून घेऊ...

हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman ने का स्वीकारला इस्लाम धर्म ? नाव बदलण्याचं कारण काय ?
Image Credit source: Instagram
Follow us on

AR Rahman Birthday : रोजा, बॉम्बे पासून ते लगान, स्लमडॉग मिलेनिअर, रॉकस्टार पर्यंत.. अनेक चित्रपटांची सुमधुर गाणी घडवणारे, प्रतिभावान संगीतकार ए.आर. रेहमान यांचा आज (6 जानेवारी) वाढदिवस. ए. आर. रहमानचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. अनेक जण त्यांच्या गाण्यांची पारायणं करत असतात, तीच गाणी रिपीट मोडवर तासनतास ऐकत असतात. जागतिक संगीतावर आपली छाप सोडणाऱ्या ए.आर. रहमान यांचे खासगी आयुष्य फारसे चर्चेत नसते, ना ते कधी फारसा लाईमलाइटमध्ये असतात. आपण बरं आणि आपलं काम बरं असा खाक्या असलेल्या रहमान यांच्याकडे सगळेच आदराने बघतात. पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बद्दल काही खास, गोष्टी जाणून घेऊ.

रहमान या नावाची जादू सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांचं मूळ, खरं नाव काय हे तुम्हाला माहीत आहे का ? ज्यांना तुम्ही ए. आर. रहमान या नावाने ओळखता त्यांचं मूळ नाव होतं दिलीप कुमार. मूळच्या हिंदू कुटुंबात जन्मलेल्या रहमान यांनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला आणि नवं नावही. असं नेमकं काय झालं की त्यांनी धर्म आणि नाव दोन्ही बदललं, चला जाणून घेऊ..

दिलीप कुमार कसे बनले ए. आर. रहमान ?

ए.आर. रहमान हा जन्माने हिंदू होता, पण वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मांतर करण्यामागे त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. दिलीप कुमार अर्थात आताचे ए. आर. रेहमान यांच्या लहानपणी घरातील परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यांच्या वडिलांचं नाव आर. के. शेखर असं होतं. पण 23 व्या वर्षी त्यांनी धर्म बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला. आणि नावही बदलून A R Rahman असं केलं.

नाव आणि धर्म बदलण्याचं कारण ?

एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या वडिलांना बरंच बर नव्हतं. एक सूफी होते, ज्यांनी त्यांच्या वडिलांवर उपचार केले. 7-8 वर्षांनी जेव्हा त्यांची पुन्हा त्यांच्याशी भेट झाली तेव्हा रहमान त्यांच्या बोलण्याने बराच प्रभावित झाला. त्यानंतर रेहमानच्या कुटुंबाने धर्मांतर केलं आणि इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हाच त्यांनी त्याचं दिलीप कुमार नाव बदलून अल्लाह रखा रहमान ठेवलं. रेहमानच्या पत्नीचं नाव सायरा बानो आहे.

ऑस्करने गौरव

ए. आर. रहमानची प्रतिभा सर्वांनाचा माहीत आहे. त्यांनी अनेक सुमधुर गाणी तर दिली पण 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना ऑस्करही मिळाला. तसेच गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कारांवरही त्यांनी नाव कोरले. रहमानचे परदेशातही अनेक चाहते आहेत. परदेशातील रस्त्यांना त्यांचं नाव दे ए. आर. रहमान यांना गौरवण्यातही आलं.