मुंबई : ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे विभक्त होणार असल्याचे सांगितले जातंय. सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा ही जोर धरताना दिसतंय. काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे या चर्चांना एक प्रकारची हवाच मिळताना दिसत आहे. घटस्फोटाची सततची चर्चा पाहून चाहते देखील चिंतेमध्ये आले आहेत. मात्र, या घटस्फोटाच्या चर्चांवर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील तूफान व्हायरल होताना दिसला.
ऐश्वर्या राय हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका या केल्या आहेत. करोडोंच्या घरात ऐश्वर्या राय हिचा चाहता वर्ग देखील आहे. मात्र, एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्या राय हिच्यासोबत असे काही घडले की, त्यानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
ऐश्वर्या राय हिची 1999 मध्ये सिमी ग्रेवाल मुलाखत घेत होत्या. यावेळी या मुलाखतीकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, यादरम्यान असा काही प्रकार घडला की, हे पाहून उपस्थित लोक हैराण झाले. ऐश्वर्या राय हिची मुलाखत सुरू असतानाच एक बाजूला बसलेला एक व्यक्ती चक्क झोपी गेला फक्त हेच नाही तर तो व्यक्ती घोरत होता.
ही बाब जेंव्हा सिमी ग्रेवाल हिच्या लक्षात आली. त्यावेळी तिने चक्क त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर थेट ऐश्वर्या राय ही हसताना दिसली. चक्क ऐश्वर्या राय हिची मुलाखत सुरू असताना कोणी व्यक्ती कसा झोपू शकतो याची चर्चा होती. या मुलाखतीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. ऐश्वर्या राय हिची फॅन फाॅलोइंग फक्त देशातच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जातंय.