मुंबई : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली होती. विशेष म्हणजे मुंबई मेरी जान म्हणत काही फोटो हे प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आज जरी प्रियांका चोप्रा ही विदेशात राहत असली तरीही ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच असते. काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमधील (Bollywood) काळे सत्य सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रियांका चोप्रा हिने मोठे आरोप हे बाॅलिवूडवर केले.
इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने स्पष्ट सांगितले की, आपल्याला कशाप्रकारे बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू होते. प्रियांका चोप्रा हिला चित्रपटांमध्ये काम दिले जात नव्हते. यासर्व गोष्टींना कंटाळूनच आपण थांबण्याचा निर्णय घेतल्याचे देखील प्रियांका चोप्रा हिने सांगितले होते. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
प्रियांका चोप्रा ही कायमच पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस हा अमेरिकेचा फेमस गायक आहे. नुकताच निक जोनस आणि त्याच्या भावांचे न्यूयॉर्कमधील एका स्टेडियममध्ये कॉन्सर्ट होते.
कॉन्सर्ट वेळी ज्यावेळी निक जोनस हा गाणे म्हणत होता त्यावेळी एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर लोकांना हा प्रकार अजिबात आवडला नसल्याचे दिसत आहे.
कॉन्सर्टमध्ये निक जोनस गाणे म्हणत असताना चक्क एका मुलीने आपली ब्रा काढून निक जोनस याच्या अंगावर फेकली. दोन मिनिटे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना नेमके काय घडले हेच कळाले नाही. या प्रकारानंतर एक मिनिट निक जोनस थांबला आणि लगेचच त्याने आपले गाणे सुरू केले. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टला प्रियांका चोप्रा देखील उपस्थित होती.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, अरे हा काय प्रकार आहे? त्याला त्याचे काम करू द्या. दुसऱ्याने लिहिले की, हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे, एक मुलगी अशाप्रकारे काम कसे करू शकते. भारतामधूनही या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.