The Kerala Story | पुण्यात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कडाक्याचा विरोध, अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली

| Updated on: May 20, 2023 | 5:53 PM

द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे अजूनही द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ ही बघायला मिळत आहे. अनेक बाॅलिवूड चित्रपटांना मागे द केरळ स्टोरी चित्रपटाने टाकले आहे.

The Kerala Story | पुण्यात द केरळ स्टोरी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कडाक्याचा विरोध, अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही चित्रपटावर सतत बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट दोन राज्यांमध्ये टॅक्स फ्री देखील करण्यात आलाय. द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा (Adah Sharma) ही मुख्य भूमिकेत असून अनेकांनी अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांना द केरळ स्टोरी चित्रपटाने कमाईमध्ये मागे टाकले आहे.

द केरळ स्टोरी या चित्रपटाचे आज पुण्यात विविध ठिकाणी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पुण्यातील या स्पेशल स्क्रिनिंगसाठी चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा स्वतः उपस्थित होती. पुण्यातील अनेक महाविद्यालयातील या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावताना अदा शर्मा ही दिसली. अदा यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधताना दिसली.

पुण्यात आल्याचे समाधान व्यक्त करत चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार देखील अदा शर्मा हिने मानले आहेत. मात्र, पुण्यात स्पेशल स्क्रिनिंग वेळी मोठा गोंधळ देखील झाल्याचे कळते आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील दोन गटातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे देखील कळत आहे.

FTII मध्ये दोन गटातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. एका गटाचा चित्रपटाच्या स्क्रिनिंगला विरोध होता. यावेळी पोलिस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. शो बंद करण्याची मागणी एका गटाने केली होती. विशेष म्हणजे चित्रपट निर्माते देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होते. पुण्यात आज विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला.

द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी विरोध केला. इतकेच नाही तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील बंदी विरोधात चित्रपट निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारला कोर्टाने मोठा झटका दिला. कोची शहरातील अनेक थिएटर मालकांनी देखील अचानकपणे द केरळ स्टोरी चित्रपटाचे शो काही दिवसांपूर्वीच बंद केले. हे सर्व सुरू असताना प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यावर अधिक भर आहे.