Video : आलिया भट्ट आणि राहा यांचा खास व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्री लेकीसोबत…

| Updated on: Oct 08, 2023 | 7:01 PM

आलिया भट्ट हिचे गेल्या काही दिवसांपासून एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आलिया भट्ट कायम चर्चेत असते.

Video : आलिया भट्ट आणि राहा यांचा खास व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्री लेकीसोबत...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आलिया भट्ट ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला (Movie) नुकताच पुरस्कार मिळालाय. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलिया भट्ट हिचे सतत काैतुक केले जातंय. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिचा राॅकी आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिच्या या चित्रपटाने धमाका केला. या चित्रपटात आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया भट्ट आमि रणवीर सिंह हे दिसले.

आलिया भट्ट ही आज बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया भट्ट हिच्यावर चाहत्यांच्या नजरा कायमच असतात. आता नुकताच आलिया भट्ट हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये फक्त आलिया भट्ट हिच नाही तर त्यांची मुलगी राहा ही देखील दिसतंय.

रविवारच्या खास दिवशी आलिया भट्ट ही मुलगी राहा हिच्यासोबत बाहेर निघालीये. आलिया भट्ट हिचा व्हिडीओमध्ये जबरदस्त लूक दिसतोय. यावेळी आलिया भट्ट हिने राहा हिला देखील घेतलंय. आलिया भट्ट गाडीमध्ये बसताना कोणासोबत तरी गप्पा मारताना दिसतंय. चाहत्यांना आलिया भट्ट हिचा हा व्हिडीओ चांगलाच आवडलाय.

आलिया भट्ट ही आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मुलगी राहा हिच्यासोबत चांगला वेळ घालवताना दिसते. आलिया भट्ट हिने 14 एप्रिल रोजी रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी आलियाने राहा हिला जन्म दिला. राहा आता 11 महिन्यांची झालीये. राहा हिच्या जन्मानंतर काही दिवसांमध्ये आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग करताना आलिया भट्ट ही दिसली. यावेळी शूटिंगसाठी आलिया ही राहा हिला काश्मीरला घेऊन गेली होती.