अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे. झिरो चित्रपटानंतर अनुष्का शर्मा कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाहीये. अभिनयापासून जरी अनुष्का शर्मा दूर असली तरीही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये मुलाला जन्म दिलाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय. अनुष्का शर्मा ही मुलाच्या जन्मानंतर आता भारतात आलीये.
विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडियममध्येही बऱ्याचदा दिसली. अनुष्का शर्मा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतंय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या मुलीचे आणि मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत.
हेच नाही तर पापाराझी यांना त्यांच्या मुलांचे फोटो घेण्यापासूनही रोखतात. आता नुकताच अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही आपल्या मुलीसोबत धमाल करताना दिसतंय. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा हिच्यासोबत वामिका देखील दिसत आहे.
अनुष्का शर्मा ही वामिकाची आवडती आयस्क्रीम देखील खाताना दिसत आहे. वामिकासोबत लहान मुलगी होऊन धमाल करताना अनुष्का शर्मा दिसत आहे. लोकांना अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. चाहत्यांना अनुष्का शर्माचा हा अंदाज चांगलाच आवडलाय.
अनुष्का शर्मा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. चित्रपटांमध्ये अनुष्का शर्मा आणि शाहरूख खानची जोडी हीट ठरलीये. अनुष्का शर्मा हिच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. मात्र, अनुष्का शर्मा हिने आपल्या पुनरागमनाबद्दल अजूनही भाष्य केले नाहीये. अनुष्का शर्मा मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.