मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. नुकताच आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही अत्यंत ग्लॅमरल लूकमध्ये दिसतंय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ एकता कपूर हिच्या पार्टीमधून बाहेर पडतानाचा आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे नुकताच एकता कपूर हिने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये एकसोबत पोहचले. यावेळी जान्हवी कपूर ही अत्यंत जबरदस्त लूकमध्ये दिसली. एकता कपूर हिने मुंबईमध्ये खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले. एकता कपूर हिच्या या पार्टीला बाॅलिवूड कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
याच दिवाळी पार्टीमध्ये जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत पोहचली. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे या पार्टीमधून बाहेर पडताना स्पाॅट झाले. जान्हवी कपूर ही पापाराझी यांना पाहून चक्क लाजताना दिलीये. याचेच काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी निळ्या रंगाच्या साडीवर जान्हवी कपूर हिचा जबरदस्त लूक दिसला.
जान्हवी कपूर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. चाहते जान्हवी कपूर हिच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, जान्हवी कपूर शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न कधी करणार आहे. दुसऱ्याने लिहिले की, मला यांची जोडी आवडते मी यांच्या लग्नाची वाट पाहतोय.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकसोबत कायमच स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे विदेशात धमाल करताना दिसले. मध्यंतरी एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप लग्न केले आहे. मात्र, यावर जान्हवी कपूर किंवा शिखर पहाडिया यांच्याकडून काहीच खुलासा करण्यात नाही आला.