राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची हैराण करणारी घटना घडलीये. या गोळीबारानंतर सर्वांनाच धक्का बसला. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. भर रस्त्यावर गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराबद्दल कळताच सलमान खान, संजय दत्त शिल्पा शेट्टी या कलाकारांनी लगेचच रूग्णालयाकडे धाव घेतली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली.
या गोळीबारानंतर दोन आरोपींना लगेचच ताब्यात घेण्यात आले. तिघांपैकी एक जण पळून गेला. ज्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी सलमान खानच्या घराचीही रेकी या आरोपींनी केल्याचे तपासात उघड झालंय. आरोपी गुरुनेल सिंगने गेल्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती.
हेच नाही तर सलमान खानच्या घराची रेकी केल्यानंतर गुरुनेल सिंगने आपला मोबाईल देखील खराब केला. त्याने त्या मोबाईलचा डिस्प्ले तोडल्याचे उघड झालंय. ‘स्नॅप चार्ट’ ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती आरोपींकडे येत होती. हे आरोपी मिळालेल्या माहितीनंतर लगेचच सर्व मेसेज डिलीट करत असत.
या आरोपींनी घरासाठी आधारकार्डही स्नॅपचॅटवर पाठवण्यात आले होते. हैराण करणारे म्हणजे आधारकार्डचा स्क्रिनशॉट घेऊन ते डिलीट करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. म्हणजेच या आरोपींच्या निशाण्यावर फक्त बाबा सिद्दीकी हेच नाही तर सलमान खान हा देखील होता. सलमान खानच्या घराची रेकी नेमकी का केली गेली हे कळू शकले नाहीये.
14 एप्रिल 2024 रोजी सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सलमान खान याच्या घरावर गोळीबार ज्यावेळी झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना गुजरातमधून पकडले. गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई गँगकडून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जाच आहेत.