बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनाला शाहरुख खान का नाही पोहोचला?, अखेर ते…

| Updated on: Oct 15, 2024 | 9:12 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेक कलाकारांनी थेट लीलावती रूग्णालयातच धाव घेतली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. भर रस्त्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आली.

बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनाला शाहरुख खान का नाही पोहोचला?, अखेर ते...
Shah Rukh Khan
Follow us on

बाबा सिद्दीकी यांच्यावर 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चक्क भर रस्त्यामध्येच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. या घटनेनंतर सर्वत्र मोठी खळबळ ही बघायला मिळाली. राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत सगळ्यांच मोठा धक्का बसला. सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या खूप जवळ होते. हेच नाही तर त्या दोघांमधील वाद देखील बाबा सिद्दीकी यांनीच मिटवल्याचे सांगितले जाते. एकेकाळी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात मोठा वाद होता. ते वाद मिटवण्याचे काम बाबा सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आले.

सलमान खान याला बिश्नोई गँगकडून सतत जीवे मारण्याची धमकी मिळताना दिसत आहे. हे असताना देखील सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमान आणि शाहरुख हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंत जवळचे होते.

बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी देखील शाहरुख खान पोहोचला नसल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सलमान खान याच्यापासून ते सोहेल खान, पूजा भट्ट, अर्पिता खान, मुन्नावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा हे बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. लीलावती रूग्णालयात शिल्पा शेट्टी आणि संजय दत्त हे देखील पोहोचले. 

अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाबा सिद्दीकी यांना श्रद्धाजंली वाहिली. यादरम्यान शाहरुख खान हा गायब झाल्याचे बघायला मिळतंय. शाहरुख खान याला या वादापासून दूर राहायचे असल्यानेच तो बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला नसल्याचे सांगितले जातंय. अजूनही यावर अभिनेता काहीच बोलताना दिसत नाहीये.

शाहरुखच्या टीमशी अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न मीडियाने केला. मात्र, त्याच्या टीमकडून या प्रकरणात माैन पाळले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल कळताच शिल्पा शेट्टी हिने थेट लीलावती रूग्णालयात धाव घेतली. फक्त हेच नाही तर अभिनेत्री रडताना देखील दिसली. संजय दत्त हा देखील रूग्णालयात जाताना दिसला.