बाॅलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे धर्मेंद्र हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. धर्मेंद्र हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. नुकताच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. या लग्न वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर यावेळी ईशा देओल देखील दिसली. मात्र, लग्नाच्या वाढदिवसाला सनी देओल आणि बाॅबी देओल हे पोहचले नाहीत.
शूटिंगमध्ये बिझी असल्याने धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बाॅबी आणि सनी पोहचू शकले नसल्याचे सांगितले जातंय. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा लग्नाचा वाढदिवसच काय तर बाॅबी देओल आणि सनी देओल हे सावत्र बहीण ईशा देओल हिच्या लग्नामध्ये देखील सहभागी झाले नव्हते. 2012 मध्ये ईशा देओलचे लग्न झाले.
ईशा देओलच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी घेतली होती. सावत्र बहिणीच्या लग्नाच्या तयारीलाच काय तर साधे लग्नाला देखील बाॅबी देओल आणि सनी देओल उपस्थित नव्हते. यावर थेट धर्मेंद्र यांनाच प्रश्न विचारण्यात आला, यावर धर्मेंद्र चांगलेच संतापल्याचे त्यावेळी बघायला मिळाले होते, यामुळे विविध चर्चा देखील रंगल्या होत्या.
धर्मेंद्र यांना विचारण्यात आले होते की, मोठे भाऊ ईशाच्या लग्नाला का नाही आले? यावर थेट धर्मेंद्र हे म्हणाले होते की, तुम्ही बकवास करू नका. धर्मेंद्र याच्या या विधानाने मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. आता मागील काही दिवसांपासून सातत्याने सांगितले जातंय की, ईशा देओल, हेमा मालिनी आणि बाॅबी देओल आणि सनी देओल यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी याच्या लग्नाच्या वाढदिवसाकडे बाॅबी देओल आणि सनी देओल यांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. यामुळेच यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे सांगितले जातंय. नुकताच बाॅबी देओल आणि सनी देओल हे कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी काही मोठे खुलासे करताना बाॅबी आणि सनी हे दिसले होते.