बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या अनेक वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होता. अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती. मात्र, एका वाईट वळणावर त्यांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय.
सतत घटस्फोटाच्या चर्चा असताना त्यावर अजिबात भाष्य करताना बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच दिसत नाहीये. ऐश्वर्या राय ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. एकेकाळी रानी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या खूप जास्त छान मैत्रिणी होत्या. मात्र, यांची मैत्री फार काळ टीकू शकली नाही.
‘चलते चलते’ चित्रपटामुळे दोघींमध्ये वाद झाला. चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे संबंध चांगले नव्हते. सलमान खान याने चित्रपटाच्या सेटवर येत मोठा हंगामा केला. यानंतर शाहरुख खान जो चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होता. त्याने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्या ऐवजी त्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला घेण्यात आले. हीच गोष्टी ऐश्वर्याला अजिबात आवडली नाही. आपल्या खास मैत्रिणीने असे केल्याने ऐश्वर्या राय ही खूप जास्त नाराज झाली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने राणी मुखर्जीला बोलणे देखील बंद केले. याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीमध्ये करताना राणी मुखर्जी दिसली.
राणी मुखर्जी ही करण जोहरच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसली. राणी मुखर्जी म्हणाली की, तुम्हाला ही कारण माहिती आहे. मला कोणाशीही काही प्रॉब्लेम नाही आणि मला अजूनही ती (ऐश्वर्या राय) आवडते. मला ऐश्वर्या राय हिच्यासोबत वैयक्तिक काहीच समस्या नाहीये.
मला वाटते की, ऐश्वर्याला माझ्याशी काहीतरी समस्या आहे. कारण तिने मला फोनवर बोलणे देखील बंद केले. आम्ही त्यानंतर कुठेही एकत्र भेटलो नसल्याचेही सांगताना राणी मुखर्जी ही दिसली. मात्र, राणी मुखर्जी हिच्यासोबत असलेल्या वादावर कधीच ऐश्वर्या राय हिने भाष्य हे केले नाहीये.