बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायने बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका केलाय. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मोठ्या संपत्तीची मालकीन ऐश्वर्या राय आहे. फक्त हेच नाही तर पती अभिषेक बच्चन याच्यापेक्षा जास्त संपत्ती ऐश्वर्या रायकडे आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असल्याची चर्चा आहे. यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा खरोखरच घटस्फोट होणार का? हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होत असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच प्रतिक्षा बंगला अमिताभ बच्चन यांनी श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आणि तेंव्हापासूनच वाद सुरू झाल्याची चर्चा आहे.
मुळात म्हणजे ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्यांना डेट केले. सलमान खान याला सर्वात अगोदर डेट करताना ऐश्वर्या राय दिसली. मात्र, त्यानंतर त्यांचे एका वाईट वळणावर ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.
सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय ही विवेक ओबेरॉय याला डेट करत होती. क्यों! हो गया ना या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि त्यानंतरच त्यांच्यामध्ये जवळीकता वाढली. मात्र, विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांची जवळीकता सलमान खान याला अजिबातच आवडली नाही.
एका मुलाखतीमध्ये थेट विवेक ओबेरॉय याने म्हटले होते की, सलमान खान याच्यासोबत असलेल्या वादामुळेच बॉलिवूडमध्ये आपल्याला काम मिळत नाहीये. ऐश्वर्या राय हिला डेट करणे विवेक ओबेरॉयला अत्यंत महागात पडल्याचे बघायला मिळाले. जर सर्वकाही ठीक राहिले असते तर ओबेरॉय कुटुबाची सून ऐश्वर्या राय ही झाली असती. पुढील काही दिवसांमध्येच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल मोठे अपडेट पुढे येऊ शकते.