प्रेग्नंसीमुळेच सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न? अत्यंत मोठा खुलासा, जवळच्या…

| Updated on: Jul 04, 2024 | 6:32 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा हिने मुंबईमध्ये झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले.

प्रेग्नंसीमुळेच सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न? अत्यंत मोठा खुलासा, जवळच्या...
Sonakshi Sinha
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा ही आपल्या लग्नात धमाल करताना दिसली. लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचले होते. सिन्हा कुटुंबियांचा या लग्नाला विरोध असल्याचे सातत्याने सांगितले गेले. मात्र, सही करताना सोनाक्षी हिने वडिलांचा हात पकडल्याचे अनेक फोटोंंमध्ये बघायला मिळाले.

सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही वर्षांपासून झहीर इक्बाल याला डेट करत होती. शेवटी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न होऊन पाच दिवसांनंतरच सोनाक्षी सिन्हा ही रूग्णालयात दाखल झाली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी म्हटले की, आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच लग्नाच्या अगोदरच सोनाक्षी सिन्हा ही देखील प्रेग्नंट होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका यूजरने लिहिले की, सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे. त्यामध्ये लिहिण्यात आले की, माझ्या दोन बॉलिवूड सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असून लवकरच ती आपल्या प्रेग्नंसीची घोषणा देखील करेल. वडील शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत खराब असताना देखील सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबत घाईमध्ये लग्न केले, कारण ती प्रेग्नंट होती.

मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, सोनाक्षी सिन्हा ही वडिलांना पाहण्यासाठीच रूग्णालयात पोहोचली होती. मात्र, असे असतानाही देखील सतत सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याचा दावा सातत्याने केला जातोय. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ नाराज असल्याची चर्चा आहे. हेच नाहीतर लग्नात लव आणि कुश हे भावाचे कर्तव्य पार पाडताना दिसले नाहीत.

नुकताच सोनाक्षी सिन्हा हिचा भाई लव सिन्हा याने सोनाक्षीच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य केले, हेच नाहीतर त्याने काही खुलासे देखील केली आहेत. लव सिन्हा याने थेट म्हटले की, मला माझे कुटुंबिय सर्वात अगोदर आहेत. माझ्या कुटुंबाच्या पुढे मला काहीच मोठे नाहीये. मी तिथे का नाही वगैरे याच्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत,असेही लव सिन्हा याने म्हटले आहे.