अंकिता लोखंडे हिने ‘या’ मोठ्या कारणामुळे मागितली महिलेची माफी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले…

| Updated on: Sep 07, 2024 | 2:33 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडे हे अभिनय क्षेत्रामधील एक अत्यंत मोठे नाव आहे. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. फक्त अभिनयच नाही तर अंकिता ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अंकिता लोखंडे हिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.

अंकिता लोखंडे हिने या मोठ्या कारणामुळे मागितली महिलेची माफी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले...
Ankita Lokhande
Follow us on

अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसली. यावेळी अनेकांनी थेट अंकिता लोखंडेच्या सासूबाईलाच खडेबोल सुनावले. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगताना दिसली. तसा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. अली गोनी याने म्हटले की, लवकरच छोटा जैन येणार आहे. अली गोनी याचे बोलणे ऐकून लाजताना विकी जैन हा दिसला होता. ज्यानंतर अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात होते.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉसनंतर लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडताना दिसली. सध्या अंकिता लोखंडे हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अंकिताच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अंकिता लोखंडे ही मार्केटमध्ये दिसत आहे. अंकिता लोखंडे हिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी पापाराझी यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, यावेळी एक महिला ही चांगलीच चिडल्याचे दिसत आहे. ती महिला मोठ्याने बोलताना दिसली. धक्का लागल्याचे त्या महिलेचे म्हणणे होते.

सुरूवातीला अंकिता लोखंडे हिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्या महिलेचा वाढलेला आवाज पाहताच अंकिता लोखंडे ही परत वापस आली आणि ती माफी मागताना दिसली. ठिक आहे… काही नाही मी माफी मागते असेही म्हणताना अंकिता लोखंडे ही यावेळी दिसली. आता अंकिताचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळताना दिसली आहे. आता अंकिता लोखंडे हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. लोक म्हणाले की, अंकिता लोखंडेला मानले पाहिजे राव. दुसऱ्याने लिहिले की, लेडी बॉस दिसत आहे अंकिता. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून अंकिता लोखंडे हिचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.