अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झाले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. देशच नाहीतर विदेशातून लोक भारतामध्ये या लग्नासाठी दाखल झाले. एक महिन्यांपासून लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन विविध ठिकाणी सुरू होते. आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार तर या लग्नात धमाल करताना दिसत आहेत. फक्त बॉलिवूड कलाकारच नाहीतर प्रत्येक क्षेत्रातील लोक या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अनंत अंबानी आणि राधिका यांच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये सहभागी झाले.
काही खास पाहुण्यांना या लग्नात थेट 2 कोटींचे घड्याळ गिफ्ट म्हणून देण्यात आले. विशेष म्हणजे या दोन कोटींच्या घड्याळ्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता सध्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका हे बसले आहेत.
स्टेजवर कार्यक्रम सुरू असताना नरेंद्र मोदी यांच्या एका बाजूला नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही बसलेली दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, श्लोका हिला झोप येत आहे. मध्येच ती डुलक्या घेताना दिसत आहे. अचानक परत ती डोळे उघडून समोर बघताना दिसत आहे.
Shloka Mehta Ambani, who was sitting beside Akash Ambani and PM Narendra Modi, falls asleep during the #ShubhAashirvaad ceremony of Anant Ambani and Radhika Merchant. #AnantAmbani #AnantRadhikaReception pic.twitter.com/4fgnHk94Ls
— CineScoop (@Cinescoop7) July 14, 2024
आता हाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत श्लोका हिची बाजू घेतल्याचे बघायला मिळतंय. बऱ्याच जणांनी म्हटले की, मुळात म्हणजे लग्न म्हटले की, माणूस अधिक थकतो आणि झोप व्यवस्थित होत नाही.
दुसऱ्याने म्हटले की, आपल्याकडे लग्नामध्ये विविध कार्यक्रम असतात आणि पाहुणे आणि प्रत्येक गोष्टीची नियोजन करण्यात झोप अजिबातच होत नाही आणि तेच श्लोका हिच्यासोबत झाले. श्लोका ही प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली. खास नियोजन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे करण्यात आले होते. विशेष म्हणजे या लग्नाची चर्चा फक्त देशातच नाहीतर विदेशातही जोरदार बघायला मिळत आहे.