अभिनय क्षेत्रामध्ये धमाका करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. धमाकेदार भूमिका ऐश्वर्या राय हिने केल्या आहेत. मोठा काळ तिने बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये गाजवलाय. नुकताच ऐश्वर्या राय हिला IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये तिच्या जबरदस्त अभिनयासाठी पुरस्कार मिळालाय. या पुरस्कार सोहळ्याला ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही खास लूकमध्ये या पुरस्कार सोहळ्यात दाखल झाल्या होत्या.
मुळात म्हणजे ऐश्वर्या रायचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. ऐश्वर्या राय हिला आयुष्यात एकदा तरी भेटण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होणारा हा व्हिडीओ IIFA अवॉर्ड्स 2024 मधील आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही खूप जास्त भावूक होताना दिसत आहे.
त्याचे झाले असे की, ऐश्वर्या राय हिला बघताच एक अँकर थेट रडण्यास सुरूवात करते. ती अँकर सांगत आहे की, ऐश्वर्या तुला भेटण्याचे माझे स्वप्न होते. आज तुला भेटत आहे तर मला हे सर्व स्वप्नच वाटत आहे. हे सर्व बोलताना ती अँकर खूप जास्त भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांमधून अश्रू येताना दिसत आहेत. ती अँकर चक्क रडताना देखील दिसत आहे.
हे पाहून ऐश्वर्या राय ही देखील भावूक झाली आणि अरे देवा…म्हणत ऐश्वर्या राय ही त्या अँकरला मिठी मारते. आता तोच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. ऐश्वर्या राय ही प्रेमाने त्या अँकरला गळ्याला लावते. लोक या व्हिडीओनंतर ऐश्वर्या राय हिचे जोरदार काैतुक करताना देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय खूप जास्त प्रेमळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटल्यावर कोणाचीही अशीच प्रक्रिया असावी असे मला वाटते. दुसऱ्याने लिहिले की, मी पहिल्यांदा ऐश्वर्याला असा प्रकारे बघितले आणि मला हे खरोखरच आवडले देखील. तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच ऐश्वर्या राय ही खूप जास्त दयाळू नक्कीच आहे आणि मला तिचा हा स्वभाव आवडलाय.